इस्त्रायलने शोधला इराणचा युरेनियम साठा? ट्रम्प-नेतन्याहू भेटीत इराणवरील हल्ल्याची ब्लूप्रिंट तयार?
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धबंदीनंतर १५ दिवसांनी मोसादने इराणने समृद्ध युरेनियम कुठे लपवले आहे ते ठिकाण शोधून काढले आहे. अहवालानुसार, इराणने पिकॅक्सच्या टेकड्याखाली बांधलेल्या भूमिगत केंद्रात समृद्ध युरेनियम लपवले आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत इराणवर पुन्हा हल्ला करण्यासंदर्भात ब्लूप्रिंट तयार केल्याचे सांगितले जात आहे. ट्रम्प यांनी इस्रायलला इराणवर पुन्हा हल्ला करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवल्याचे मानले जात आहे. इस्रायलने इराणने लपवलेल्या ४०८ किलोग्रॅम समृद्ध युरेनियमचे स्थान शोधून काढले आहे. त्यामुळे पुढील ४८ तासांत इराणवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराण देखील हल्ल्याच्या शक्यतेबद्दल सतर्क झाला आहे. यामुळे नेतान्याहू इराणवरील हल्ल्याचा दुसरा टप्पा सुरू करणार आहे का? हा हल्ला पुढील ४८ तासांत होणार आहे का? या प्रश्नांवर चर्चा सुरु झाली आहे.
११ जुलै रोजी इस्त्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा अमेरिका दौरा पूर्ण होणार आहे. त्यानंतर नेतन्याहू अमेरिकेतून इस्त्रायलला परतणार आहे. नेतन्याहू इस्त्रायलमध्ये दाखल होताच इराणवर पुन्हा हल्ला सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. पुढील ४८ तासांत इस्त्रायल इराणवर हल्ला करु शकतो. या हल्ल्याची ब्यूप्रिंट ट्रम्प-नेतन्याहू भेटीत तयार झाली.
अमेरिकेकडून हल्ल्याची परवानगी?
अमेरिकेने इस्त्रायलला इराणवर हल्ला करण्याची परवानगी दिल्याचे वृत्त आहे. त्यासंदर्भातील संकेत मागील २४ तासांपासून मिळत आहे. वॉशिंग्टनमध्ये मागील हल्ल्याच्या वेळी ज्या पद्धतीने संकेत मिळत होते, त्याच पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. मागील २४ तासांत ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यात दोन वेळा आप्तकालीन बैठक झाली. त्या बैठकीनंतर बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकन संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली. पुढील २४ तासांत ट्रम्प यांच्या कार्यक्रमात केवळ इंटेलिजेन्स ब्रीफिंग आणि इंटेलिजेन्स मीटिंगचा समावेश आहे. यापूर्वी इराणवर जेव्हा हल्ला झाला होता, त्यावेळी ट्रम्प यांचे यापद्धतीचे शेड्यूल होते.
मोसादने शोधला युरोनियमचा साठा
इराण आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धबंदीनंतर १५ दिवसांनी मोसादने इराणने समृद्ध युरेनियम कुठे लपवले आहे ते ठिकाण शोधून काढले आहे. अहवालानुसार, इराणने पिकॅक्सच्या टेकड्याखाली बांधलेल्या भूमिगत केंद्रात समृद्ध युरेनियम लपवले आहे. पिकॅक्स हिल्स इराणच्या नतान्झ अणुऊर्जा केंद्राजवळ आहेत.
