Israel-Hamas conflict | हमासची वाट लागणार, भूमध्य सागरात खास इस्रायलसाठी येतेय ‘यूएसएस गेराल्ड आर फोर्ड’

Israel-Hamas conflict | 'यूएसएस गेराल्ड आर फोर्ड' कुठल्याही क्षणी होणार दाखल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून आदेश जारी. तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षात आतापर्यंत 1,100 जणांचा मृत्यू झालाय.

Israel-Hamas conflict | हमासची वाट लागणार, भूमध्य सागरात खास इस्रायलसाठी येतेय यूएसएस गेराल्ड आर फोर्ड
Israel-Hamas conflict
| Updated on: Oct 09, 2023 | 11:32 AM

जेरुसलेम | इस्रायलकडून हमास विरोधात युद्धाची घोषणा करण्यात आलीय. हमासने शनिवारी आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला इस्रायलवर केला. असं काही आपल्यासोबत होईल, याची इस्रायलने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. हमासच्या दहशतवाद्यांना इस्रायलमधील नागरिक ठिकाणांना लक्ष्य केलं. एरवी हमासकडून सैनिकी तळांना लक्ष्य केलं जातं. गाझा पट्टीतून हमासचे हजारो दहशतवादी दक्षिण इस्रायलमध्ये घुसले. त्यांनी अक्षरक्ष: इथे उन्माद केले. महिला, मुल कोणाला सोडलं नाही. हल्ल्याची भीषणात पाहता इस्रायलने हमास विरोधात युद्धाची घोषणा केली. एकाचवेळी इस्रायलला अनेक शत्रूंचा सामना करायचा आहे. त्यामुळे अमेरिकेने इस्रायलला लष्करी मदत पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ही मोठी घडामोड आहे. थेट अमेरिका इस्रायलसाठी युद्धात उतरु शकते. त्यांनी तसेच संकेत दिले आहेत. अमेरिकन नौदलाच्या विमानवाहू युद्धा नौका, फायटर जेट्स इस्रायलच्या दिशेने रवाना झाले आहेत.

इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन युद्ध नौका आणि फायटर विमान इस्रायलच्या जवळ तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. पूर्व भूमध्यसागरात ‘यूएसएस गेराल्ड आर फोर्ड’ या विमानवाहू युद्धनौकेसह अन्य वॉरशिप पाठवण्यात आल्या आहेत, पेंटागॉनकडून ही माहिती देण्यात आलीय. अमेरिका इस्रायल जवळच्या क्षेत्रात फायटर एअरक्राफ्टच्या स्क्वाड्रन वाढवणार आहे. रविवारीच युद्धनौका आणि फायटर विमान रवाना झाली आहेत. यूएस सेंट्रल कमांडकडून हे सांगण्यात आलय. हमासच्या हिंसाचारात इस्रायलमध्ये चार अमेरिकन्सचा मृत्यू झालाय.

इस्रायलने अजून खरा हल्ला केलेलाच नाहीय

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन रविवारी इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी बोलले. अमेरिका इस्रायलला सर्व लष्करी सहाय्यता देणार आहे. अमेरिकेकडून इस्रायलला दारुगोळ्याचाही पुरवठा करण्यात येईल. तीन दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षात आतापर्यंत 1,100 जणांचा मृत्यू झालाय. इस्रायलमध्ये मृतांचा आकडा 700 पेक्षा जास्त आहे. अमेरिकन सपोर्टमुळे इस्रायलच बळ आणखी वाढणार आहे. कारण इस्रायलने अजून खरा हल्ला केलेलाच नाहीय.