AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas war | उलटा गेम, इस्रायलची पॅलेस्टाइनसमोर मोठी अट, बंधक तुमच्या ताब्यात राहतील, पण…

Israel-Hamas war | इस्रायलने पॅलेस्टाइनसमोर मोठी अट ठेवलीय. हमासचा जगभरात निषेध होतोय. इस्रायलने गाझा पट्टीतील पूर्ण नेटवर्क तोडून टाकलय. 150 लोकांना बंधक बनवून ठेवलय.

Israel-Hamas war | उलटा गेम,  इस्रायलची पॅलेस्टाइनसमोर मोठी अट, बंधक तुमच्या ताब्यात राहतील, पण...
israel Hamas war
| Updated on: Oct 12, 2023 | 3:43 PM
Share

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धात एक नवीन वळण आलय. हमासने जवळपास 150 लोकांना बंधक बनवून ठेवलय. इस्रायल आणि हमासमध्ये 7 ऑक्टोबरपासून लढाई सुरु आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये घुसून तांडव केलं. रॉकेट हल्ला केला. 1 हजारपेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. त्याशिवाय दुसऱ्या देशाचे 100 पेक्षा जास्त लोक मारले गेले. हमासने अनेक लोकांना बंधक बनवलय. या कृत्यानंतर हमासचा जगभरात निषेध होतोय. गाझा पट्टीत हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केलं जातय. गाझा पट्टीत इस्रायली फायटर विमानांकडून सातत्याने बॉम्बफेक सुरु आहे. इस्रायलने हमासला मूळापासून संपवण्याची शपथ घेतली आहे. इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात पॅलेस्टाइनमधील सर्वसामान्य नागरिकांचा सुद्धा मृत्यू होतोय. दहशतवाद्यांशिवाय महिला आणि मुलं सुद्धा आपल्या प्राणाला मुकतायत.

इस्रायलने गाझा पट्टीतील पूर्ण नेटवर्क तोडून टाकलय. वीज आणि पाणी पुरवठा खंडीत केलाय. पॅलेस्टिनी जनतेसमोर खाण्या-पिण्याच संकट निर्माण झालय. खरंतर हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या तुरुंगातील दहशतवाद्यांना सोडवण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना बंधक बनवल होतं. पण आता उलटा गेम झालाय. इस्रायलने पॅलेस्टाइनसमोर मोठी अट ठेवलीय. जो पर्यंत हमास इस्रायली बंधकांना सोडणार नाही, तो पर्यंत गाझामधील वीज-पाणी बंद राहील. कुठे झाली इमर्जन्सी बैठक?

इस्रायलने हे जे पाऊल उचललं, त्यावर टीका सुरु झालीय. पॅलेस्टाइन मुद्यावरुन बुधवारी अरब लीगच्या 22 देशांनी काहिरामध्ये इमर्जन्सी बैठक केली. त्यांनी इस्रायलसाठी फर्मान जारी केलं. इस्रायलने गाझा पट्टीवरुन सर्व निर्बंध हटवावेत, असं अरब लीगच्या देशांनी एकमताने ठरवलं. हमासने सर्वातआधी आमच्या बंधकांना सोडावं, त्यानंतर वीज-पाण्य़ाचा पुरवठा सुरु होईल. हमासने जवळपास 150 लोकांना बंधक बनवून ठेवलय. यात इस्रायली नागरिकांशिवाय अमेरिकी सुद्धा आहेत. बंधकांच्या सुटकेसाठी बोलणी सुरु आहेत. इस्रायलने आता हमाससमोर अट ठेवलीय.

Follow Us
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...
मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान...
Sanjay Raut : मुंबईतील 300 हून अधिक SRA प्रकल्पांत घोटाळा? 30 हजार कोटीचा नुकसान, राऊतांच्या दाव्याने खळबळ
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजप...
अमित शहांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेसेनेची जोरदार बॅनरबाजी; भाजपलाही टाकलं मागे!
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट