पाकिस्तान इराणसाठी इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार? पाकिस्तान संरक्षण मंत्र्यांनी काय दिले संकेत?

पाकिस्तानकडून इस्त्रायलविरोधात भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी तसे संकेत दिले आहे. गाझावरील हल्ल्यादरम्यान सर्व मुस्लीम देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. जर सर्व मुस्लीम देश एकत्र आले नाही तर पुढे काहीही होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान इराणसाठी इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार? पाकिस्तान संरक्षण मंत्र्यांनी काय दिले संकेत?
ख्वाजा आसिफ
Jitendra Zavar | Updated on: Jun 14, 2025 | 10:57 AM

इराण आणि इस्त्रायल यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर भीषण हल्ले करत आहेत. या युद्धाबाबत पाकिस्तानकडून महत्वाचे संकेत मिळाले आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इस्त्रायलविरोधातील युद्धात सर्व मुस्लीम राष्ट्रांना एकत्र येत इराणची साथ देण्याचे वक्तव्य केले आहे. मुस्लीम राष्ट्र एकत्र झाले नाही तर इस्त्रायल हल्ले करत राहणार आहे, असे ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी पत्रकारांशी बोलताना संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले, इराणवर ज्या पद्धतीने हल्ला झाला ते चुकीचे आहे. आम्ही इराणसोबत उभे राहणार आहोत. आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. गाझावरील हल्ल्यादरम्यान सर्व मुस्लीम देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. जर सर्व मुस्लीम देश एकत्र आले नाही तर पुढे काहीही होऊ शकते. सर्वांचा समान शत्रू असणाऱ्यासोबत लढा उभारण्याची वेळ आली आहे. सर्वांचा शत्रू असणारा हा देश इस्त्रायल आहे. इस्त्रायलला आताच काही उपाय केले नाही तर सर्व मुस्लीम मारले जातील.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ काही दिवसांपूर्वी इराण दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी इराणचे सुप्रीम लीडर अली खामेनेई यांची भेट घेतली होती. त्यावेळी इस्त्रायलविरोधात पाकिस्तानकडून काहीही वक्तव्य आले नाही, त्यामुळे खोमेनेई यांनी नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, मुस्लीम देश असूनही इस्त्रायल विरोधात पाकिस्तान शांत आहे. पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहे. पाकिस्तान इस्त्रायलविरोधात लढण्यासाठी तयार झाला तर इस्त्रायल घाबरणार आहे. त्यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून कोणतीही वक्तव्य समोर आले नव्हते.

इस्त्रायलने इराणवर शुक्रवारी २०० पेक्षा जास्त क्षेपणास्त्र डागत भीषण हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणच्या सैन्य दलाचा प्रमुख आणि दोन अणू शास्त्रज्ञाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी रात्री इराणनेसुद्धा इस्त्रायलवर अनेक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us