रात्री झोपले पुन्हा सूर्य पाहिलाच नाही, इस्रायलचा या बड्या मुस्लिम देशावर भीषण हल्ला, अनेकांचा मृत्यू, जगभरात खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, इस्रायलने पुन्हा एकदा एका मुस्लिम राष्ट्रावर भीषण हल्ला केला आहे, या हल्ल्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून, जगभरात खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात होणार का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

रात्री झोपले पुन्हा सूर्य पाहिलाच नाही, इस्रायलचा या बड्या मुस्लिम देशावर भीषण हल्ला, अनेकांचा मृत्यू, जगभरात खळबळ
इस्रायलचा भीषण हल्ला
Image Credit source: tv9 marathi
Updated on: Dec 04, 2025 | 4:32 PM

गेल्या अनेक दिवसांपासून इस्रायल आणि गाझामध्ये युद्ध सुरू होतं, या युद्धामध्ये गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. प्रचंड प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. दरम्यान हमास आणि इस्रायलमध्ये युद्धविराम झाला आहे. मात्र त्यानंतर आता इस्रायलकडून पुन्हा एकदा एका मुस्लिम राष्ट्रावर भीषण हल्ला करण्यात आला आहे, इस्रायलने आता थेट सीरियावर हल्ला केला आहे. दक्षिण सीरियामधील एका गावात इस्रायलकडून हा हल्ला करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या गोळीबारात जवळपास 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. सीरियाची वृत्तसंस्था असलेल्या सना न्यूजने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना सीरियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं इस्रायलचा निषेध केला आहे. हा एक युद्ध अपराध असल्याचं सीरियानं म्हटलं आहे. इस्रायला पुन्हा एकदा या भागात युद्धाचा वनवा भडकवायचा आहे, या प्रदेशाला अशांत करायचं आहे, असा आरोपही सीरियाकडून करण्यात आला आहे.

या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या इयाद ताहिर यांनी म्हटलं की रात्री आम्ही झोपलो होतो, जेव्हा सकाळी जाग आली, तेव्हा सर्वत्र भीषण असा गोळीबार चालू होता. मी घराबाहेर पडलो तेव्हा समोरचं दृश्य हादरवणारं होतं. इस्रायलच्या सैन्याकडून हल्ला सुरू होता, गावात सैन्य घुसलं होतं, चारही बाजुने टँक उभे करण्यात आले होते. त्यानंतर जोरदा गोळीबार करण्यात आला. तर या घटनेत जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीने सांगितलं मी माझ्या संरक्षणासाठी सैन्यावर गोळीबार केला, या घटनेत माझा भाऊ मृत्युमुखी पडला आहे.

दरम्यान दुसरीकडे इस्रायलच्या सैन्याकडून असा दावा करण्यात आला आहे की, या गावात जामा इस्लामिया ग्रुपचे खतरनाक दहशतवादी लपून बसले होते, त्यांना या गावात आश्रय देण्यात आला होता, त्यामुळे आम्ही इथे सर्च ऑपरेशन सुरू केले, आम्ही अनेक दहशतवाद्यांना पकडलं आहे. इस्रायलकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अजूनही या भागात सर्च ऑपरेशन सुरूच असल्याची माहिती समोर येत आहे.