चिनी चॅनलकडून यहुदींवर ‘हे’ गंभीर आरोप, इस्राईलच्या राजदुताकडून आक्षेप, नव्या वादाचं कारण काय?

| Updated on: May 20, 2021 | 4:16 AM

चीनच्या एका वृत्तवाहिनीने आपल्या चर्चेत यहुदी समाजावर असा आरोप केलाय जो ऐकून इस्राईलचा चांगलाच संताप झालेला पाहायला मिळाला.

चिनी चॅनलकडून यहुदींवर हे गंभीर आरोप, इस्राईलच्या राजदुताकडून आक्षेप, नव्या वादाचं कारण काय?
Follow us on

बीजिंग : एकिकडे जग कोरोना विषाणूच्या संसर्गाशी लढत आहे, तर दुसरीकडे इस्राईल आणि हमासमधील युद्धाने जगाची काळजी वाढवलीय. याबाबत चीनने देखील वेळोवेळी आपली भूमिका जाहीर केलीय. मात्र, आता चीनच्या एका वृत्तवाहिनीने आपल्या चर्चेत यहुदी समाजावर असा आरोप केलाय जो ऐकून इस्राईलचा चांगलाच संताप झालेला पाहायला मिळाला. यानंतर इस्राईलच्या चीनमधील राजदुताने चीन सरकारकडे याबाबत नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळे यावर आता चीन सरकार आणि चीनची सीजीटीएन वृत्तवाहिनी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय (Israel object controversial statement of China CTGN TV Channel on Yehudi).

इस्राईलच्या दुतावासाने एक ट्विट करत या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली. इस्राईलने म्हटलं, “यहुदींकडून जगावर राज्य करण्याच्या षडयंत्राचे सिद्धांत संपले असतील असं आम्हाला वाटत होतं. मात्र, दुर्दैवाने यहुदी लोकांच्या विरोधाचा क्रुर चेहरा पुन्हा एकदा समोर आलाय. चीनच्या एका सरकारी वृत्तवाहिनीकडून व्यक्त करण्यात आलेली यहुदी विरोधी मतं ऐकून आम्ही अचंबित आहोत. याशिवाय आम्हाला अधिक काही सांगायचं नाही. अद्याप यावर आम्हाला सीजीटीएन वृत्तवाहिनीकडून यावर उत्तर मिळालेलं नाही.”

चीनच्या चॅनलने यहुदींबद्दल काय म्हटलंय?

सीजीटीएन वृत्तवाहिनीचे निवेदक झेंग जूनफेंग यांनी अमेरिकेचा इस्राईलला असलेला पाठिंबा लोकशाही मुल्यांवर आधारित आहे की अमेरिकेतील यहुदी लॉबीमुळे हा पाठिंबा आहे असा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, “अमेरिकेची इस्राईलला पाठिंबा देण्याचं धोरण अमेरिकेवरील श्रीमंत यहुदींच्या प्रभावातून आलंय. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरण ठरवणाऱ्यांवर यहुदी समुहाच्या लॉबीचा प्रभाव आहे.”

“अमेरिकेत यहुदी समाजाची शक्तीशाली लॉबी आहे? “

“यहुदी समाजाचं आर्थिक क्षेत्रात आणि इंटरनेट जगतात वर्चस्व आहे. त्यामुळे लोक म्हणत आहेत तशी यहुदी समाजाची शक्तीशाली लॉबी आहे? असू शकते. अमेरिकाही इस्राईलचा वापर पश्चिम आशियात मोर्चेबांधणीसाठी एका चौकीप्रमाणे करत आहे,” असंही झेंग जूनफेंग यांनी म्हटलं.

चीनची भूमिका काय?

सीसीटीव्हीने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे वृत्तवाहिनी स्पष्टीकरण देते आणि चीन सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

हेही वाचा :

इस्राईलच्या हल्ल्यात गाझा बेचिराख, हादरवून टाकणारे फोटो

इस्रायलविरुद्ध लढण्यासाठी जमले पण, मुस्लिम देशांची आपापसांतच जुंपली

PHOTOS : इस्राईल-हमास युद्धाचे अंगावर काटा आणणारे प्रसंग, असा विद्ध्वंस पाहिलाय?

व्हिडीओ पाहा :

Israel object controversial statement of China CTGN TV Channel on Yehudi