Israel-Iran Update : ट्रम्प इथे बोलत बसले, इस्रायलने तिथे काम करुन टाकलं, आदेश धुडकावला, इराणच्या मिसाइल हल्ल्याला जशास तसं उत्तर

Israel-Iran Update : इस्रायल-इराणमध्ये पुन्हा मोठं युद्ध भडकेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. इराणने नको ते पाऊल उचलल्यानंतर इस्रायलही गप्प बसला नाही. इस्रायलने इराणला हादरवून सोडलं आहे. नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचं आवाहनही धुडकावून लावलं.

Israel-Iran Update : ट्रम्प इथे बोलत बसले, इस्रायलने तिथे काम करुन टाकलं, आदेश धुडकावला, इराणच्या मिसाइल हल्ल्याला जशास तसं उत्तर
Donald Trump
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 08, 2026 | 8:54 AM

अमेरिका-इराण युद्धात मागच्या अनेक दिवसांपासून परिस्थिती थोडीफार नियंत्रणात होती. पण आता ती हाताबाहेर जाईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. इराणने रविवारी रात्री इस्रायलच्या दिशेने 11 मिसाइल्स डागली. इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टिमने ही सर्व मिसाइल्स इंटरसेप्ट केली. 8 एप्रिलला झालेल्या युद्धविरामानंतर इराणने पहिल्यांदा इस्रायलवर असा थेट हल्ला केला. इराणच्या या आक्रमक कृतीनंतर इस्रायलने याचा बदला घेतला आहे. इस्रायलने इराणवर जोरदार प्रत्युत्तराची कारवाई केली आहे. त्यामुळे युद्धाचा भडका उडणार अशी स्थिती आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश धुडकावून लावला. इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराणवर हल्ला करु नका असं आवाहन केलं होतं.

मी नेतन्याहू यांना फोन करुन सांगेन की, इराणवर कुठल्याही प्रकारचा नवीन हल्ला करु नका. पण त्याआधीच इस्रायलने इराणला दणका दिला आहे. परिस्थिती अजून चिघळून हाताबाहेर जाऊ नये यासाठी मी नेतन्याहू यांना फोन करुन रोखणार आहे. नवीन युद्ध सुरु न करता परिस्थिती शांत राहणं गरजेच आहे. ट्रम्प यांनी आवाहन करुनही इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर हल्ले केले. इस्रायली लष्कराने मध्य आणि दक्षिण इराणवर हल्ले केले. तेहरानच्या मेहराबाद एअरपोर्टवर इस्रायलने बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. नजफा येथील ड्रोन प्रोडक्शन युनिटवर हल्ला केला.

इस्रायलकडे कुठलाही पर्याय नाही

इराणने लगेच पावलं उचलत इमाम खुमैनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाण पुढील सूचनेपर्यंत बंद केली आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. हा एअरपोर्ट एप्रिल महिन्यात बंद होता. अलीकडेच हा एअरपोर्ट सुरु करण्यात आला होता. अमेरिका-इराणमध्ये होणारा कुठलाही करार इस्रायलला मान्य करावा लागेल असं डोनाल्ड ट्रम्प फायनान्शिअल टाइम्सला दिलेल्या इंटरव्यूमध्ये म्हणाले आहेत. इस्रायलकडे कुठलाही पर्याय नाही असं ते म्हणाले.

मोठं युद्ध रोखणं हा अमेरिकेचा इरादा

अलीकडे झालेल्या हल्ल्यांचा संभाव्य करारावर काहीही परिणाम होणार नाही असं ट्रम्प म्हणाले. हा संघर्ष जुना असून दीर्घकाळापासून सुरु आहे असं ते म्हणाले. संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेऊन पुढे कुठलंही मोठं युद्ध रोखणं हा अमेरिकेचा इरादा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us