खोल समुद्रात इस्रायलची मोठी कारवाई, अनेक नौका रोखल्या, पाकिस्तानच्या माजी खासदाराला घेतलं ताब्यात
'ग्लोबल सुमूद फ्लोटिला' नावाने चालू असलेल्या या अभियानात औषधं आणि जेवणं गाजाला पोहोचवल जात होतं. या नावेत 40 पेक्षा जास्त नागरिक होते. यात 500 खासदार, वकील आणि एक्टिविस्ट होते.

इस्रायली सैन्याने बुधवारी गाजाला जाणारे परदेशी कार्यकर्ते आणि मदत साहित्यांनी भरलेल्या अनेक नौका रोखल्या. या नौका ते इस्रायली बंदरात घेऊन आले. गाजाच्या नाकाबंदी विरोधात सगळ्यात जगात चर्चेत असलेले विरोध प्रदर्शन यामुळे बाधित झालं. न्यूज एजेंसी रॉयटर्सनुसार,सर्वात चर्चित प्रवासी स्वीडिश जलवायु एक्टिविस्ट ग्रेटा थनबर्ग सुद्धा या नौकेमध्ये होती. ती डेकवर असल्याच इस्रायली परराष्ट्र मंत्रालयाच्या व्हिडिओमध्ये दिसतय. तिच्या चारही बाजूला सैनिक होते. इस्रायलने हमासशी संबंधित माजी पाकिस्तानी खासदार मुश्ताक अहमद खानला सुद्धा ताब्यात घेतलं. इस्रायली सुरक्षा पथकांनी फ्लोटिलामध्ये बसलेल्या 37 देशांच्या 200 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतलं.
“हमास-सुमूद फ्लोटिलाच्या अनेक नौका सुरक्षितपणे थांबवण्यात आल्या. त्यांच्या प्रवाशांना इस्रायलच्या बंदरात घेऊन जाण्यात येत आहे. ग्रेटा आणि तिचे साथीदार सुरक्षित आणि स्वस्थ आहेत” असं परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर म्हटलं आहे.
आमच मिशन पूर्णपणे अहिंसक आणि मानवीय
‘ग्लोबल सुमूद फ्लोटिला’ नावाने चालू असलेल्या या अभियानात औषधं आणि जेवणं गाजाला पोहोचवल जात होतं. या नावेत 40 पेक्षा जास्त नागरिक होते. यात 500 खासदार, वकील आणि एक्टिविस्ट होते. एजन्सीच्या रिपोर्टनुसार, फ्लोटिलाने टेलीग्रामवर अनेक व्हिडिओ शेअर केलेत. यात प्रवासी आपले पासपोर्ट दाखवताना सांगतायत की, ‘त्यांना जबरदस्तीने इस्रायलला नेलं जात आहे. आमच मिशन पूर्णपणे अहिंसक आणि मानवीय असल्याच ते सांगत आहेत’
नौकांनी माघारी फिरावं असा इशारा
भूमध्य सागराच्या मार्गे पुढे जाणाऱ्या फ्लोटिलाने संपूर्ण जगाच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. तुर्की, स्पेन आणि इटली सारख्या देशांनी आपल्या नौका आणि ड्रोन्स पाठवले. जेणेकरुन गरजेच्यावेळी लोकांना मदत करता येईल. नौकांनी माघारी फिरावं असा इशारा इस्रायलकडून देण्यात आला होता.
दहशतवादी कृत्य ठरवलं
तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने फ्लोटिलावर इस्रायलच्या कारवाईला हल्ला आणि दहशतवादी कृत्य ठरवलं आहे. तुर्कीने म्हटलय की, इस्रायलने निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात घातले. इटलीत इस्रायलच्या कारवाई विरोधात प्रदर्शन सुरु आहे.
