ब्रेकींग! इस्त्रायलने टेकले गुडघे? इराणकडे युद्ध थांबवण्यासाठी केली मागणी, काय मिळाले उत्तर?

इस्रायली माध्यमांनी वृत्त दिले आहे की युद्ध संपविण्यासाठी इराणला संदेश पाठवण्यात आला आहे. इस्रायलच्या या संदेशाला इराणने आता काय उत्तर दिले जाणून घ्या...

ब्रेकींग! इस्त्रायलने टेकले गुडघे? इराणकडे युद्ध थांबवण्यासाठी केली मागणी, काय मिळाले उत्तर?
Iran and Israel
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 23, 2025 | 6:47 PM

इस्रायलने इराणला संदेश पाठवून युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलच्या या आवाहनाला इराणनेही प्रतिसाद दिला आहे. इराणने म्हटले आहे की, आता युद्ध थांबवण्याची वेळ नाही. ही बातमी इस्रायली माध्यमांच्या हवाल्याने समोर आली आहे. या युद्धाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा 13 जून रोजी इस्रायलच्या लढाऊ विमानांनी इराणवर हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे अनेक लष्करी जनरल आणि अणुशास्त्रज्ञ मारले गेले होते.

या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही इस्रायलला लक्ष्य केले होते. इराणने इस्रायलच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते. इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायलच्या नागरिक आणि लष्करी आस्थापनांना मोठे नुकसान झाले आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील या लढाईत रविवारी अमेरिकाही सहभागी झाली होती. अमेरिकेच्या बी-2 बॉम्बर विमानांनी इराणच्या तीन अणुस्थळांना लक्ष्य केले होते.

वाचा: बोमेन इराणीपासून ते टाटांपर्यंत; या फेमस भारतीयांचं थेट इराणशी नातं; यादीत कोण कोण?

अमेरिकेने इराणला कोणता संदेश देण्यास सांगितला?

इराणच्या अणुस्थळांवरील अमेरिकी हल्ल्यानंतर इस्रायल इराणसोबतचे युद्ध थांबवू इच्छित आहे. इस्रायलच्या ‘दी टाइम्स ऑफ इजरायल’ या वृत्तपत्राने अमेरिकी वृत्तपत्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. बातमीत इस्रायली आणि अरब सूत्रांचा उल्लेख आहे.

इस्रायलच्या चॅनल-12 नुसार, इस्रायलला वाटते की, पुढील काही दिवसांत तो इराणच्या अण्वस्त्र आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या धोक्यांचा नायनाट करेल, ज्यामुळे त्याच्या ‘रायझिंग लायन’ मोहिमेचा उद्देश साध्य होईल. अरब अधिकाऱ्यांनी अमेरिकी वृत्तपत्राला सांगितले की, अमेरिकेने अरब अधिकाऱ्यांना इराणपर्यंत हा संदेश पोहोचवण्यास सांगितले आहे की, इस्रायल लवकरच ही मोहीम संपवेल.