बोमेन इराणीपासून ते टाटांपर्यंत; या फेमस भारतीयांचं थेट इराणशी नातं, यादीत कोण कोण?
लेख इराणमधून भारतात आलेल्या पाच प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनावर प्रकाश टाकतो. पालोनजी मिस्त्री, टाटा कुटुंब, फारुख शोकरी, अर्देशिर ईराणी आणि बोमन ईरानी यांच्या यशस्वी कारकिर्दींचा आढावा घेतला आहे. या व्यक्तींनी आपल्या कठोर परिश्रमाने आणि प्रतिभेने भारताच्या विविध क्षेत्रांमध्ये मोठे योगदान दिले आहे. या लेखातून त्यांच्या संघर्षांचा आणि यशाच्या गोष्टींचा समावेश आहे, जो प्रेरणादायी आहे.

Iranian in India : इस्रायल आणि इराण दरम्यान युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर एअर स्टाईक सुरू आहेत. या युद्धात अमेरिकेने उडी मारली आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अण्वस्त्र तळांवर हल्ला चढवला आहे. त्यामुळे जगभरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. एककाळ होता जेव्हा 1979च्या इराणी क्रांतीनंतर पारसी नागरिकांनी इराण सोडलं होतं. या क्रांतीनंतर नवीन इस्लामी शासन आलं. पण लोक या सत्तेला सहमत नव्हते. क्रांतीनंतर नागरिकांचा छळ केला गेला. त्यामुळे निवांत आणि शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी या इराणी नागरिकांनी इतर देशांकडे कूच केली. त्यातील काही लोक भारतातही आले आणि भारताचे झाले. आज आपल्या टॅलेंट आणि मेहनतीने या इराणी लोकांनी भारतावर छाप सोडली आहे. या पैकी पाच इराणी टॉप मोस्ट भारतीयांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश.
पालोनजी शापूरजी मिस्त्री
पालोनजी शापूरजी मिस्त्री यांचे पूर्वज इराणमधून भारतात आले. मिस्त्री हे पारसी समुदायातील आहेत. धार्मिक छळापासून वाचण्यासाठी ते भारतात आले. शापूरजी यांचा जन्म 1929मध्ये मुंबईत झाला. त्ायंचे आजोबांनी 1865मध्ये शापूरजी पालोनजी ग्रुपची स्थापना केली. शापूरजी यांनी या कंपनीला यशाच्या शिखरावर नेलं. त्यांनी मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ताजमहल पॅलेस हॉटेल आणि ओबेरॉय हॉटेल सारख्या असंख्य आयकॉनिक इमारती बनवल्या. त्यांनी त्यांच्या कंपनीचा कारभार परदेशापर्यंत फोफावला होता. त्यांनी 1971मध्ये ओमानच्या सुल्तानचा महल बांधला. शापूरजी टाटा ग्रुपचे सर्वात मोठा शेअर होल्डर आहेत. त्यांच्या मेहनतीने त्यांना भारत आणि युरोपातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत नेऊन बसवलं.
वाचा: …आणि एकेकाचा गेम फिनिश, जगाला थक्क करुन सोडणाऱ्या मोसादच्या ऑपरेशन नार्नियाची Inside Story
टाटा फॅमिली
टाटा कुटुंबांचे पूर्वज 8 व्या शतकात इराणमधून भारतात आले. त्यांच्या कुटुंबाने गुजरातच्या नवसारीत 25 पिढ्या वास्तव्य केलं. त्यानंतर व्यवसायानिमित्ताने ते मुंबईत आले. 1868 मध्ये जमशेदजी टाटा यांनी एक ट्रेंडिंग कंपनी सुरू गेली. तोच आजचा टाटा ग्रुप. टाटा कुटुंब नेहमीच देश आणि समाजाच्या भल्यावर विश्वास ठेवतो. जमशेदजी आणि त्यांची मुलं, दोराबजी आणि रतन टाटा यांनी त्यांची संपत्ती चॅरिटी ट्रस्टला दिली. आज टाटा ट्रस्ट अंतर्गत 14 ट्रस्ट वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे. रतन टाटा हे टाटा ट्रस्ट्सचे चेअरमन होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा नवीन चेअरमन बनले आहेत. नोएल यांनी ट्रेंट आणि टाटा इंटरनॅशनलला मोटं केलं.
फारुख शोकरी
फारुख शोकरी हे मुंबईतील प्रसिद्ध क्यानी एंड कंपनी कॅफेचे मालक आहेत. 1904 मध्ये इराणमधून आलेल्या खोदराम मरेजबान यांनी हे कॅफे सुरू केलं होतं. हा मुंबईतील सर्वात जुना कॅफे आहे. फारुख यांचे वडील अफलातून शोकरी इराणहून मुंबईत आले होते. त्यांनी 1960 मध्ये हा कॅफे विकत घेतला होता. फारुख 1995पासून कॅफे चालवत आहेत. त्यांनी पारसी जेवण उदाहरणार्थ, सल्ली बोटी आणि धनसाक मेन्यूत जोडला आहे. या ठिकाणी 24 रुपयाच्या आत चहा आणि 200 रुपयाच्या आत खिमा मिळतो. बॉलिवूड स्टार्सपासून सामान्य लोक या ठिकाणी येतात. जुन्या पॉलिश खुर्च्या हे या कॅफेचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी आल्यावर जुन्या काळात आल्यासारखं वाटतं.
अर्देशिर ईराणी
अर्देशीर इराणी यांनी भारतात बोलपट सुरू केले. 1886 मध्ये पुण्यात जन्मलेले अर्देशिर हे पारशी कुटुंबातील आहेत. त्यांचे पूर्वज इराणमधून आले होते. अर्देशिर यांनी 1931मध्ये भारतात पहिला बोलपट तयार केला. आलाम आरा असं या बोलपटाचं नाव होतं. या सिनेमाने जग बदललं. या सिनेमाने केवळ प्रेक्षकांना मोहून टाकलं नाही तर भारतीय सिनेमाची दिशाच बदलली. अर्देशिर यांनी त्यांच्या स्टुडिओत इम्पीरियल फिल्म कंपनीच्या नावाने सिनेमे बनवले. त्यांनी भारतीय सिनेमाला एका उंचीवर नेऊन ठेवलं.
बोमन ईरानी
बोमन ईरानी आज बॉलिवूडचं प्रसिद्ध नाव आहे. बोमन यांचा जन्म 1959मध्ये मुंबईत झाला. त्यांचे पूर्वज इराणमधून भारतात आले होते. बोमन यांचं बालपण संघर्षात गेलं. त्यांच्या जन्माच्या आधीच त्यांच्या वडिलांचं निधन धालं होतं. बोमन यांनी फोटोग्राफीने करिअरला सुरुवात केली. त्यानंतर थिअटर केलं. नंतर ते सिनेमात आले. ‘मुन्ना भाई एमबीबीएस’मध्ये डॉ. अस्थानाची भूमिका असो की ‘3 इडियट्स’मधील वायरस, बोमन यांनी प्रत्येक भूमिका गाजवली. त्यांच्या अभिनयामुळे त्यांचा एक चाहता वर्ग निर्माण झालेला आहे.
