
अमेरिकेकडून सध्या फक्त धमक्यांची भाषा सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प तेहरान रिकामी करा, वैगेर अशा धमक्या देत आहेत. पण या युद्धात उतरायचं की नाही, याबद्दल अमेरिकेत अजून तरी एकमत दिसत नाहीय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सगळ्या जगामध्ये आपणच कसे तारणहार आहोत, अशी शेखी मिरवत आहेत. पण त्यांना अजून रशिया-युक्रेन युद्ध थांबवता आलेलं नाही. फक्त श्रेय घेण्यासाठीचा त्यांचा सगळा खटाटोप दिसून येतो. इस्रायल-इराण युद्धात उतरण्याआधी अमेरिका खूप सावध पावलं टाकत आहे. दुसऱ्याबाजूला इस्रायल आपल्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करतोय. अमेरिका अजूनही जे करायला घाबरतेय ते इस्रायलने जाहीर केल. इस्रायलने तशी शपथच घेतली आहे.
मध्य इस्रायलच्या बीर्शेबा रुग्णालयावर इराणने आज हल्ला केला. या हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री कॅट्ज यांनी मोठी घोषणा केली आहे. आता इराणचा सुप्रीम लीडर खामेनेईला सोडणार नाही, त्याला मारणार अशी कॅट्ज यांनी घोषणा केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी बदला घेण्याची शपथ घेतली आहे, त्यानंतर कॅट्ज यांचं हे वक्तव्य आलय. द जेरूसलेम पोस्टनुसार इस्रायलचे संरक्षण मंत्री कॅट्ज म्हणाले की, “रुग्णालयावरील हल्ल्यासाठी थेट खामेनेई जबाबदार आहेत. त्यामुळे पुढचं टार्गेट तेच असतील. हा एक युद्ध गुन्हा आहे. त्याची खामेनेईला शिक्षा मिळेल”
त्यासाठी आम्हाला काहीही करावं लागलं तरी चालेल
इराण हायपरसोनिक मिसाइल्सचा वापर करत आहे. यावरुन एक गोष्ट स्पष्ट आहे, तो सुधरणार नाही. आता आम्ही नव्या पद्धतीने इराणवर हल्ला करु असं इस्रायलचे संरक्षण मंत्री कॅट्ज म्हणाले. “आम्ही खामेनेईची राजवट हादरवणार. त्यासाठी आम्हाला काहीही करावं लागलं तरी चालेल. इस्रायलवरील सर्व संभाव्य हल्ले संपवण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत” असं कॅट्ज म्हणाले. “इराणचा दहशतवादी हुकूमशाह (अयातुल्ला अली खामेनेई) च्या सैनिकांनी सरोका रुग्णालय आणि नागरिक वस्त्यांवर हल्ले केले. आता इराणला याची किंमत चुकवावी लागेल” असं नेतन्याहू यांनी एक्सवर लिहिलय. इस्रायली अधिकाऱ्यांनुसार, या हल्ल्यात 6 जण गंभीररित्याज जखमी झाले आहेत. 20 पेक्षा जास्त लोक किरकोळ जखमी झाले आहेत.