डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर? जल्लोषाचा फोटो व्हायरल, या देशाच्या पंतप्रधानांनी फोटो शेअर करत…

Donald Trump Nobel Peace Prize : डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून जगातील मोठे सात युद्ध रोखल्याचा दावा करताना दिसत आहेत. हेच नाही तर त्यांनी नोबेल शांती पुरस्कारावर देखील दावा केला. त्यामध्येच आता मोठी खळबळ उडवणारा फोटो व्हायरल झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर? जल्लोषाचा फोटो व्हायरल, या देशाच्या पंतप्रधानांनी फोटो शेअर करत...
Donald Trump Nobel Peace Prize
| Updated on: Oct 10, 2025 | 12:40 PM

डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल आणि हमास युद्धाबाबत अत्यंत मोठी घोषणा केली. यामधील मोठा डाव म्हणजे नोबेल शांती पुरस्कार जाहीर होण्याच्या काही तास अगोदरच त्यांनी बरोबर युद्धबंदीची घोषणा करत म्हटले की, 20 कलमी प्रस्ताव दोन्ही देशांनी मान्य केला असून पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी शनिवारी केली जाईल. नुकताच करारावर सह्या देखील करण्यात आल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी काही मुस्लिम देशांच्या मदतीने इस्त्रायल हमास युद्धाबाबत प्रस्ताव तयार केला. जो प्रस्ताव इस्त्रायलने लगेचच मंजूर केला. मात्र, हमासने हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वेळ घेतला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आता डोनाल्ड ट्रम्प यांना शांतीचा नोबेल पुरस्कार मिळावा याकरिता भाष्य करत थेट एक खळबळ उडवणारा फोटोच सोशल मीडियावर शेअर केला.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एका नाट्यमय रित्या नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे उघडपणे समर्थन केले. नेतन्याहू यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एआय जनरेटेड फोटो शेअर केला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये नेतन्याहू यांनी नॉर्वेजियन समितीला आवाहन केले की, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार द्या. या पुरस्कारासाठी फक्त आणि फक्त तेच पात्र असल्याचा दावाही त्यांनी केला.

कॅप्शनच्या शेवटी त्यांनी सुवर्णपदकाचे काही इमोजी देखील शेअर केले. एआय जनरेटेड फोटोमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांती पुरस्कार मिळल्याचे दाखवण्यात आले. शेअर केलेल्या एआय-जनरेटेड फोटोमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या गळ्यात नोबेल शांतता पुरस्कार पदक घातल्याचे स्पष्ट दिसत आहे. फोटोमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू देखील ट्रम्प यांच्यासोबत उभे असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

आज नोबेल पुरस्कार जाहीर होणार असतानाच अशाप्रकारचा फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. मात्र, हा फोटो खरा नसून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एआय जनरेट करून सोशल मीडियावर शेअर केलाय. हा फोटो पाहून अनेकांना वाटत आहे की, खरोखरच डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांती पुरस्कार मिळाला. इस्त्रायलने 20 कलमी प्रस्तावाला मंजूरी दिल्यानंतर हमासवर दबाव टाकण्याचे काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.