AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

H-1B व्हिसाचा मोठा फटका भारतातील लग्नांवर, कुटुंबियांनी घेतले थेट धक्कादायक निर्णय, नवरदेव..

H-1B Visa Rule Changes : H-1B व्हिसाच्या नियमात मोठे बदल करण्यात आली. आता हा व्हिसा मिळवण्यासाठी तब्बल 88 लाख भरावे लागणार आहेत. यामुळे अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्यांची मोठी हिरमोड झालीये. हेच नाही तर H-1B व्हिसाच्या नियमात अजून काही मोठे बदल करून डोनाल्ड ट्रम्प काय नियम बदलतील याचा अजिबात भरोस नाही.

H-1B व्हिसाचा मोठा फटका भारतातील लग्नांवर, कुटुंबियांनी घेतले थेट धक्कादायक निर्णय, नवरदेव..
H-1B Visa Rule Changes Side Effects Indian Marriage
| Updated on: Oct 09, 2025 | 2:50 PM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदला केला. H-1B व्हिसा मिळवण्यासाठी तब्बल 88 लाख रूपये शुल्क भरावे लागणार आहे. यासोबतच नियम कडक केली आहेत. अमेरिकेतील कंपन्यांनी आणि विद्यापीठांनी आपल्या H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना अमेरिकेच्या बाहेर न जाण्याचा इशारा दिला. अमेरिकेत सर्वाधिक भारतीय लोक H-1B व्हिसावर नोकऱ्या करतात. आता ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या नियमात केलेल्या बदलाचा सर्वाधिक फटका भारतीय विवाहांवर दिसून येतोय. H-1B व्हिसा 88 लाख रूपये शुल्का आकारण्यात आल्यानंतर भारतातील NRI नवरदेवांची मागणी कमी झाली. यासोबतच ठरलेल्या विवाहांना सुद्धा नवरदेव अमेरिकेतून भारतात येऊ शकत नाहीये. मोठ्या आयटी कंपन्यांनी H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये सध्या अमेरिकेच्या बाहेर जायचे नाही, असे स्पष्ट सांगितले आहे.

रिपोर्टनुसार, अमेरिकेत नोकरी करणाऱ्या नवदेवाची मागणी जास्त होती. जवळपास सर्वांना जावई बापू अमेरिकेत नोकरी करणारे काही दिवसांपूर्वी हवे होते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्याप्रकारे H-1B व्हिसाच्या नियमात बदल केले, त्यानंतर अमेरिकेत नोकरी करणाऱ्या मुलांचे स्थळ मुलीकडील लोक नाकारत आहेत. मुलींसाठी आंतरराष्ट्रीय जोडीदार शोधणारी भारतीय कुटुंबे आता भारतातच राहणारे मुले मुलीसाठी शोधत आहेत. डोनाल्ड ट्रम्प कधी काय निर्णय घेतली, याचा भरोसा राहिला नाही.

H-1B व्हिसा हा अमेरिकेतील अनिवासी व्हिसा आहे, जो अमेरिकेतील तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, औषध, वित्त आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांसाठी परदेशी कामगारांना कामावर ठेवण्याची परवानगी देतो. अमेरिकेचा ज्याच्याकडे H-1B व्हिसा आहे, अशा नवदेवांची लग्नासाठी मोठी मागणी असायची. शिवाय आपल्या मुलीला अमेरिकेत जाता येईल, याकरिता पालक देखील H-1B व्हिसा धारक जावई शोधण्यासाठी सर्व प्रयत्न करत. आता अशा स्थळांना स्पष्ट नकार दिला जातोय.

या व्हिसासह अमेरिकेत काम करणाऱ्यांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये मंजूर झालेल्या एकूण H-1B व्हिसा लाभार्थ्यांपैकी जवळजवळ 71 टक्के भारतीय होते. H-1B व्हिसा मिळवण्यासाठी आता 88 लाख रूपये शुल्क भरावे लागणार आहे. हा मोठा धक्का अमेरिकेने भारताला दिला आहे. H-1B व्हिसाच्या नियमातील बदलानंतर अनेक भारतीयांनी लगेचच अमेरिका देखील गाठली.

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.