
टॅरिफवरुन भारत आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढत चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने भारताला धमक्या देत आहेत. टॅरिफचे दर वाढत आहेत. भारत सरकारचं म्हणणं आहे की, जो काही निर्णय होईल, तो देशहिताचा असेल. ट्रम्प यांच्या धमक्यानंतरही भारत अमेरिकेसमोर झुकायला तयार नाहीय. दोन्ही देशांच्या या लढाईत इस्रायल कोणासोबत उभा आहे?. कारण इस्रायलचे भारत आणि अमेरिका दोन्ही देशांसोबत चांगले संबंध आहेत. या प्रश्नाच उत्तर स्वत: पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिलय.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सुरु असलेल्या टॅरिफ वादात नेतन्याहू यांनी भारताच्या रणनितीक भूमिकेच पूर्णपणे समर्थन केलं आहे. ते असं सुद्धा म्हणालेत की, ‘भारत एक मजबूत भागीदार आहे, ही वॉशिंग्टन डिसीमध्ये समज आहे’ इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी इस्रायलमधील भारतीय राजदूत जे पी सिंह यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक भक्कम करणं, खासकरुन संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. जेरुसलेम येथील पंतप्रधान कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी नेतन्याहू यांनी भारत दौऱ्याची इच्छा व्यक्त केली.
नेतन्याहू काय म्हणाले?
जेरुसलेममध्ये भारतीय राजदूत जे पी सिंह यांची भेट घेतल्यानंतर नेतन्याहू म्हणाले की, ‘मला लवकरच भारतात येण्याची इच्छा आहे’ नेतन्याहू यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सुरु असलेल्या टॅरिफ वादात भारताच्या रणनितीक भूमिकेच जोरदार समर्थन केलं. भारत एक आपला मजबूत भागीदार आहे, याची वॉशिंग्टन डिसीमध्ये समज आहे असं ते म्हणाले.
भारत दौऱ्यावर जाण्याचा विचार करतोय
भारतासोबत आपले दृढ् संबंध असल्याचे इस्रायली पंतप्रधान म्हणाले. मी लवकरच भारत दौऱ्यावर जाण्याचा विचार करतोय. त्यांनी भारत-अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या टॅरिफ वादावर सुद्धा प्रतिक्रिया दिली. लवकरात लवकर या विषयात तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
कुठल्या मुद्यांवर चर्चा?
ते म्हणाले की, “भारत आणि अमेरिका चांगले मित्र आहेत. दोन्ही देशांमध्ये इतकी घट्ट मैत्री आहे की, कुठल्याही समस्येवर सहज तोडगा काढतील” या बैठकीबद्दल इस्रायली पंतप्रधानांनी सोशल मीडियावर लिहिलय की, “मी आणि भारतीय राजदूतांनी द्विपक्षीय सहकार्य, सुरक्षा आणि आर्थिक मुद्यांवर चर्चा केली”
Prime Minister Benjamin Netanyahu met today, in his Jerusalem office, with Indian Ambassador to Israel J.P. Singh.
The Prime Minister and the Ambassador discussed the expansion of bilateral cooperation, especially on security and economic issues. pic.twitter.com/bgcIIvgXp1
— Prime Minister of Israel (@IsraeliPM) August 7, 2025
पूर्ण गाझा पट्टी ताब्यात घेण्याचा इरादा
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना गाझा पट्टी पूर्णपणे ताब्यात घेण्याचा इरादा बोलून दाखवलाय. “आम्हाला पूर्ण गाझावर नियंत्रण हवं आहे. कारण आम्हाला गाझाला हमासच्या दहशतीपासून मुक्त करायचं आहे. आम्हाला गाझामध्ये असं नागरिक प्रशासन हवं आहे, जे हमास सारखं नसेल, तसचं इस्रायलच्या विनाशाच विचार करणारं नसेल” असं नेतन्याहू म्हणाले.