AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी घेतला पंतप्रधान मोदी यांच्यासोबत खास सेल्फी, फोटो शेअर करत लिहिले..

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इटली दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले, त्यांनी याबाबतचा एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला. आता सोशल मीडियावर हाच फोटो व्हायरल होत आहे.

पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी घेतला पंतप्रधान मोदी यांच्यासोबत खास सेल्फी, फोटो शेअर करत लिहिले..
Giorgia Meloni and Narendra Modi selfie
| Updated on: May 20, 2026 | 8:59 AM
Share

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी युरोपियन देशांच्या दाैऱ्यावर आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात केंद्र सरकारकडून मोठे निर्णय घेतले जात आहेत. यादरम्यानच कच्च्या तेलाची कमी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली. धक्कादायक म्हणजे पहिली वाढ केल्यानंतर पाच दिवसांमध्येच पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली. नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन करत म्हटले की, पुढच्या 1 वर्षाकरिता सोने खरेदी करणे टाळा. परकिय चलणावरील दबाव कमी करण्याकरिता नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केले. यासोबतच त्यांनी विदेशवारी टाळण्याचेही आवाहन केले. आपल्या युरोपच्या दाैऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीमध्ये पोहोचले. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इटलीच्या दाैऱ्याचे विशेष निमंत्रण दिले होते. त्यानंतर ते इटलीच्या दाैऱ्यावर गेले.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काढलेला खास सेल्फी शेअर केला. हा सेल्फी शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन दिले. त्यांनी लिहिले की, रोममध्ये आपले स्वागत आहे.. माझ्या मित्रा… आता हाच फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी घेतला आणि तोच सोशल मीडियावर शेअर केला. 2023 मध्ये पहिल्यांदा जॉर्जिया मेलोनी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो शेअर केला होता. इटलीच्या हॉटेलमध्ये भारतीय लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास पद्धतीने स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात व्दिपक्षीय बैठक होईल. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होईल. युरोपियन संघात इटली चाैथा सर्वात मोठा भारताया व्यापार भागीदार बनला आहे.

2025 मध्ये दोन्ही देशांमध्ये व्दिपक्षीय व्यापार 14.25 बिलियन युरो झाला. इटलीच्या कंपन्यांनी भारतात 3.66 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली. दोन्ही देशांनी लष्करी उपकरणांमध्येही करार केले. क्वांटम टेक्नोलॉड, ऑर्टिफिशियल इंटेलिजेंस यामध्येच संयुक्तपणे काम करण्याबाबत करार केले. मागील काही वर्षांपासून भारत आणि इटली यांच्यातील संबंध अधिक मजबूत होताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे इटलीमध्ये तब्बल 1.87 लाखाच्या जवळपास भारतीय लोक राहतात.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ