AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले? वाचा…

Sharad Pawar and PM Modi : आज मुंबईतील माजी प्रदेश व जिल्हा पदाधिकारी यांच्या स्नेहमेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शरद पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले? वाचा...
Sharad Pawar and ModiImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 19, 2026 | 10:55 PM
Share

शरद पवार हे केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे. शरद पवार यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाची पदे भुषविलेली आहेत. देशातील अनेक नेते त्यांना आपले आदर्श मानतात. अनेक विरोधी नेतेही त्यांचे कौतुक करतात. मात्र आज मुंबईतील माजी प्रदेश व जिल्हा पदाधिकारी यांच्या स्नेहमेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊयात.

इंदिरा गांधींवर भाष्य

मुंबईतील कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, मी संयोजकांचे धन्यवाद मानतो. आज हा कार्यक्रम आयोजित केला. तुमच्या उमेदीच्या काळात तुम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये काम केलं. मी वयाच्या अठराव्या वर्षी मी पुण्यात युवक काँग्रेसमध्य़े सहभागी झालो होतो. आम्ही काम करत असताना इंदिरा गांधी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या. इंदिरा गांधी नंतर पंतप्रधान झाल्या, त्यांचा रशिया दौरा झाला. त्यांच स्वागत करण्यात आले नाही, त्यावेळी इंदिरा गांधी लहान मुलांबरोबर खेळायला लागल्या. रशियाचे राष्ट्रपती यांच्या लक्षात आले की आपण स्वागत केले नाही. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती.’

इंदिरा गांधींसोबत काम करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘सुरुवातीला बारामती युवक काँग्रेसचा प्रमुख झालो. 4 वर्षांनी महाराष्ट्राचा प्रमुख झालो. आम्ही विनंती केली, आम्हाला पंडित नेहरूंना भेटायचे आहे, शेतकऱ्यांचे आणि इतर प्रश्न नेहरू यांच्या समोर मांडण्याचे ठरले. पंडित नेहरू समोर आले आणि आम्ही काय बोलायचे ते विसरलो. त्यानंतर इंदिरा गांधींसोबत काम करण्याची संधी मिळाली हे आमचे भाग्य आहे.’

शरद पवारांकडून मोदींचे कौतुक

शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना म्हटले की. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका वेगळी असू शकते. पण आज देशाच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचे काम मोदी करत आहेत ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही. देशाची प्रतिष्ठा जिथे येते तिथे राजकीय मतभेद काढायचे नसतात.’ दरम्यान, याआधीही शरद पवार यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक केले होते.

Follow Us
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...