Japan earthquake : सर्वात मोठा भूकंप; तीव्र धक्कांनी लोकांची रस्त्यावर पळापळ, हादरवणारा व्हिडिओ समोर
जपानमध्ये सर्वात मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे हादरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जपानमध्ये सर्वात मोठा भूकंप झाल्याचं समोर आलं आहे. तीव्र भूकंपानंतर जपानच्या दक्षिण भागात त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. या भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. या प्रदेशात गेल्या काही दिवसांत 42 भूकंपांची नोंद झाली आहे. त्यापैकी सर्वात मोठा भूकंप हा ७.१ तीव्रतेचा आहे.
जपानच्या हवामान विभागाच्या माहितीनुसार, जपानमध्ये भूकंपाची नोंद ही कुमामोटो प्रांतात झाली आहे. जपानच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानमधील हा सर्वात मोठा भूकंप आहे. भूकंपानंतर हवामान विभागाने त्सुनामाीचा इशारा दिला आहे. त्यामुळे समुद्र आणि किनारपट्टीच्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. जपान सरकारने कुमामोटो व्यतिरिक्त क्यूशू बेटावरील नागासाकी, कागोशिमा, फुकुओका, सागा, ओइता आणि मियाजाकी प्रांतात भूकंपाचा इशारा दिला आहे. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जिवीतहानी झाल्याची माहिती आलेली नाही. स्थानिक प्रशासनाने तातडीने मदतीसाठी धाव घेतली. शासनाचे बचाव पथक सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
सर्वाधिक भूकंप होणाऱ्या देशात जपनाचा समावेश होतो. जपानमध्ये वारंवार होणाऱ्या भूकंप आणि त्सुनामीमुळे इशारा देणारी सर्वात चांगली व्यवस्था उभारण्यात आली आहे. या सिस्टिममुळे काही सेकंदात लोकांना मेसेज जातो. त्यामुळे नागरिकांचं नुकसान कमी प्रमाणात होते. येत्या काही तासांत पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्यूशू बेटावर राहणार्या लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. काही तासांनतर ही परिस्थिती नियंत्रणात येईल.
Instructions by Prime Minister in Response to the Large Earthquake in Kumamoto Prefecture (16:29) pic.twitter.com/fsxY7xJx5F
— PM’s Office of Japan (@JPN_PMO) July 28, 2026
जपानचे पंतप्रधान कार्यालयाने कुमामाटो प्रांतात भूकंप झाल्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांना तातडीने मदतीचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधानाने स्पष्ट केलं की, या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाची लवकरात लवकर पाहणी आणि मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित यंत्रणांना स्थानिक प्रशासनाच्या मदतीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. लोकांच्या जीवनाला सर्वाच्च प्रधान्य दिले पाहिजे, या भूकंपात एखाद्या ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले पाहिजे. त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे, असे आदेश देण्यात आले आहेत.
❗️LISTEN AS MASSIVE SHAKES from tower cam as 7.1M EARTHQUAKE HITS https://t.co/ygzG8lZQyg pic.twitter.com/cRRcgAzF1f
— RT (@RT_com) July 28, 2026