
रशियात आज सकाळी 8.8 तीव्रतेचा महाभूकंप आला आहे. या भूकंपाने मोठमोठ्या त्सुनामी लाटा उसळल्या आहेत. भूकंपाचा फटका एकट्या रशियालाच बसला नाही तर जपान आणि अमेरिकेलाही या भूकंपाचा मोठा फटका बसला आहे. रशियात 15 फूट उंच त्सुनामीच्या लाटा उसळल्या आहेत. तर जपानमध्ये 3 मीटरहून अधिक उंच त्सुनामीच्या लाटा उसळत आहेत. अजूनही जपानमध्ये त्सुनामी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अणू बॉम्ब स्फोट होऊ शकतो, अशी भीती असल्यानेच जपानच्या फुकूशिमा अणू ऊर्जा केंद्राला तात्काळ खाली करून हे केंद्र बंद करण्यात आलं आहे.
आता या त्सुनामीच्या धडकी भरवणाऱ्या लाटा समुद्रकिनाऱ्यावर पोहोचल्या आहेत. अनेक भागांमध्ये नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आल्याचीही माहिती मिळतंय. जगातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक रशियाच्या किनाऱ्यावर धडकला आहे. बुधवारी पहाटे हा भूकंप समुद्रामध्ये झाला. ज्यामुळे उत्तर पॅसिफिकमध्ये त्सुनामी आली आणि दक्षिणेकडील अलास्का, हवाई आणि न्यूझीलंडमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला.
तीन देशांवर धोक्याचे संकट आहे. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. या भूकंपात नेमके किती नुकसान झाले हे अजूनही स्पष्ट होऊ शकले नाहीये. मात्र, तीन देशांवर त्सुनामीचे संकट आहे. त्सुनामीच्या भीतीने जापानमधील अणुऊर्जी प्रकल्प बंद करण्यात आला. जपानच्या अणुऊर्जा प्रकल्पाजवळचा त्सुनामीच्या मोठ्या लाटा उसळत आहेत. जापानमध्ये त्सुनामीचे तिनदा सायरन वाजल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालंय. त्सुनामीच्या भीतीने लोकांनी उंच इमारतीवर आश्रय घेतलाय.
जपान हवामान संस्थेच्या माहितीनुसार, 16 ठिकाणी 40 सेंटीमीटर 1.3 फूट उंचीचे त्सुनामी लाटा दिसल्या आहेत. समुद्राच्या लाटा होक्काइडोपासून टोकियोच्या ईशान्येकडे पॅसिफिक किनाऱ्यावर दक्षिणेकडे पुढे जात आहेत. त्सुनामीच्या इशाऱ्यानंतर समुद्रकिनाऱ्याच्या लगत असलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलंय. काही हेल्पनंबरही जारी करण्यात आली. संपूर्ण जगाचे लक्ष सध्या या त्सुनामीकडे आहे. पुढील काही तास या तिन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाचे असल्याचे बोलले जातंय. सर्व यंत्रणा कामाला लागली असून अजूनही नुकसान नेमके किती झाले, याची माहिती पुढे येऊ शकली नाही.