जपानचे पंतप्रधान Fumio Kishida आणि Pm Modi यांची मोठी घोषणा, भारतात 3.2 लाख कोटी गुंतवणार

| Updated on: Mar 19, 2022 | 8:35 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Modi) आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese PM Fumio Kishida) यांच्यात दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची घोषणा करण्यात आलीय.

जपानचे पंतप्रधान Fumio Kishida आणि Pm Modi यांची मोठी घोषणा, भारतात 3.2 लाख कोटी गुंतवणार
जपानची भारतात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : जपानचे पंतप्रधान सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. 14व्या भारत-जपान शिखर परिषदेत (Shikhar Parishad) सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी  (PM Modi) आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Japanese PM Fumio Kishida) यांच्यात दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये चर्चा पार पडली. या चर्चेनंतर भारतात जपान तब्बल 3.2 लाख कोटी गुतवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  दोन्ही देशांमध्ये प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चाही झाली. याशिवाय युक्रेन आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले आहे की, भारत-जपान भागीदारी पुढे नेण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल, शांतता, समृद्धी आणि प्रगतीसाठी भागीदारी!, असे ट्विट त्यांच्याकडून करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसात जगात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत, त्यानंतर या घोषणेने जपान आणि भारताचे संबंध आणखी मजबूत झाले आहेत.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

जपानचे पंतप्रधान काय म्हणाले?

आज अनेक गोष्टींमुळे संपूर्ण जग हादरले आहे, भारत आणि जपान यांच्यात घनिष्ठ भागीदारी असणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आमचे विचार व्यक्त केले, युक्रेनमध्ये रशियाच्या गंभीर आक्रमणाबद्दल बोललो. आम्हाला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे शांततापूर्ण तोडगा हवा, असे मत जपानच्या पंतप्रधानांनी बैठकीनंतर व्यक्त केले आहे.

गंभीर विषयांवर चर्चा

मोठ्या गुंतवणुकीची घोषणा

या बैठकीदरम्यान पंतप्रधान किशिदा यांनी पुढील काही वर्षांत भारतात 3.2 लाख कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली .  2014 मध्ये जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांनीही पुढील 5 वर्षांसाठी भारतात 3.5 ट्रिलियन युआनची गुंतवणूक केली होती. त्यानंतर आता पुन्हा या चर्चेनंतर मोठ्या आर्थिक घडामोडी झाल्या आहेत.

काशिदा यांचा पहिला दौरा

किशिदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. जपानचे पंतप्रधान झाल्यानंतर फुमियो किशिदा यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. पीएम मोदींसोबतच्या शिखर बैठकीत दोन्ही बाजूंना द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलुंचा आढावा घेण्याची आणि तो वारसा पुढे नेण्याची संधी दोन्ही देशांना मिळेल. 2018 मध्ये टोकियो येथे दोन्ही देशांमधील शेवटची शिखर परिषद झाली होती. त्यानंतर 2020 आणि 2021 मध्येही कोरोना विषाणूच्या साथीमुळे ही शिखर परिषद होऊ शकली नाही. डिसेंबर 2019 मध्ये, पंतप्रधान मोदी आणि त्यांचे तत्कालीन जपानी समकक्ष शिंजो आबे यांच्यात गुवाहाटी येथे प्रस्तावित वार्षिक शिखर परिषद नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर झालेल्या व्यापक निषेधाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली.

‘द काश्मिर फाईल्स’वरुन वाद सुरुच; आता संजय राऊतांकडून ‘बेळगाव फाईल्स’!

MIM ने भाजपाविरोधी असल्याचं सिद्ध करावं, Ncp च्या सुरात काँग्रेसचा सूर, MIM “अग्निपरीक्षा” देणार?

भागवत कराडांची MVA च्या आमदारांना ऑफर, प्रश्न विचारताच धनंजय मुंडेंनी हात जोडले