भागवत कराडांची MVA च्या आमदारांना ऑफर, प्रश्न विचारताच धनंजय मुंडेंनी हात जोडले

भागवत कराडांची MVA च्या आमदारांना ऑफर, प्रश्न विचारताच धनंजय मुंडेंनी हात जोडले
धनंजय मुंडे
Image Credit source: TV9

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडं असणारं परभणीचं पालकमंत्रिपद काहीच दिवस माझ्याकडे राहावं असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.

महेंद्रकुमार मुधोळकर

| Edited By: Yuvraj Jadhav

Mar 19, 2022 | 6:11 PM

बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या हस्ते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाननंतर धनंजय मुंडे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याकडं असणारं परभणीचं पालकमंत्रिपद काहीच दिवस माझ्याकडे राहावं असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी महाविकास आघाडीच्या आमदारांना दिलेल्या ऑफर संदर्भात विचारलं असता धनंजय मुंडे यांनी हात जोडत अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

परभणीचं पालकमंत्रिपद काहीच दिवस राहावं

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी म्हणजेच परभणीचे पालक मंत्रिपदाची जबाबदारी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान यावर आज धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया देत हे पालकमंत्रिपद माझ्याकडे काही दिवसच राहावं, अशी प्रार्थना करतो असं म्हणत माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

भागवत कराड यांच्या ऑफरवर बोलण्यास नकार

बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी धनंजय मुंडे बोलत होते. केंद्रीय मंत्री यांनी महाविकास आघाडीच्या नाराज आमदारांना भाजपात येण्याची ऑफर दिली होती. यासंदर्भात विचारलं असता मंत्री धनंजय मुंडे यांनी कराड यांना हात जोडत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.

जिल्हा परिषद इमारतीचं उद्घाटन

बीड जिल्हा परिषद इमारत तयार होऊन तब्बल चार महिने उलटले आहेत. जिल्हा परिषदेचे कामकाज देखील नवीन इमारतीत सुरू आहे. सोमवारी जिल्हा परिषदेवर प्रशासक रुजू होणार आहे. त्यापूर्वीच या इमारतीचे उदघाटन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या इमारतीचे उदघाटन बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील सर्व आमदारांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्या

आघाडीचा एकही आमदार फुटणार नाही, Bhagwat Karad पुड्या सोडत आहेत; अब्दुल सत्तार यांचा पलटवार

MCA ने मुंबई पोलिसांचे 15 कोटी थकवले, थकबाकी वसुलीनंतरच सामन्यांना सुरक्षा देण्याची मागणी


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें