बायडन यांच्या एका निर्णयामुळे भारतीय IT व्यावसायिकांना होणार फायदा, प्रत्येक वर्षी देणार 80,000 व्हिसा

| Updated on: Jan 21, 2021 | 7:59 AM

या महत्त्वाच्या निर्णयामुळे अमेरिकेतील हजारो भारतीय आयटी व्यावसायिकांना (IT Professional) मोठा फायदा होणार आहे.

बायडन यांच्या एका निर्णयामुळे भारतीय IT व्यावसायिकांना होणार फायदा, प्रत्येक वर्षी देणार 80,000 व्हिसा
जो बायडन
Follow us on

नवी दिल्ली : अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती म्हणून जो बायडन (Joe Biden) यांनी शपथ घेतली. यानंतर, ते काँग्रेसला कायमचं वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे विधेयक पाठवणार आहेत. ज्यामध्ये इतर गोष्टींबरोबरच रोजगार-आधारित ग्रीन कार्डची (Green Card) प्रति-मर्यादा हटवण्याची तरतूद करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे अमेरिकेतील हजारो भारतीय आयटी व्यावसायिकांना (IT Professional) मोठा फायदा होणार आहे. खरंतर, अमेरिकेमध्ये अनेक भारतीय हे कायम कायदेशीर निवासस्थानाच्या कायद्यामध्ये बदल व्हावा यासाठी वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. (joe biden new immigration bill will beneficial for indian it professionals)

व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 2021 च्या अमेरिकन नागरिकत्व कायद्याने इमिग्रेशन सिस्टमला उदारीकरण केलं. या अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, या विधेयकात कुटुंबं सुरक्षित ठेवणं, देशाच्या अर्थव्यवस्थेला प्रगती देणं, मध्य अमेरिकेतून कायमचं वास्तव्य करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करणं असे महत्त्वाचे मुद्दे नमूद करण्यात आले आहेत.

भारतीय आयटी व्यावसायिकांना होणार मोठा फायदा

या विधेयकामुळे अमेरिकेमध्ये राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या नागरिकत्व मिळवण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. अधिकाऱ्याने सांगितलं की, हे विधेयकामध्ये कुटुंबांना काढून टाकणारे अनेक कायदे रद्द करण्यावर अमेरिकन सरकार विचार करत आहे. इतकंच नाही तर प्रत्येक देशामध्ये रोजगार आधारित ग्रीन कार्डसाठी निश्चित केलेली मर्यादाही काढून टाण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

या विधेयकामुळे भारतीय आयटी व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. खासकरून जे एच-1बी व्हिसावर अमेरिकेत आले आहेत, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. अधिक माहितीनुसार, या लोकांना सध्याच्या कायमचं वास्तव्य करण्यासाठी सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. कारण इथे ग्रीन कार्ड किंवा कायमस्वरुपी कायदेशीर निवासस्थानासाठी प्रति देश सात टक्के वाटप करण्याची यंत्रणा आहे.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर, बिडेन यांनी त्यांच्या एका पत्रात व्हिसा प्रणालीत सुधारणा करण्यासाठीचा मुद्दा ही अधोरेखित केला आहे. ज्यासाठी अनेक भारतीय कुटुंब वाट पाहत आहेत. इतकंच नाही तर विधेयकात दर वर्षी 55,000 ऐवजी 80,000 व्हिसा देण्याचा बायडेन विचार करत असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यांचा हा निर्णय अमेरिकन अर्थव्यवस्थेला आणखी चालना देईल. (joe biden new immigration bill will beneficial for indian it professionals)

संबंधित बातम्या – 

Donald Trump Farewell : अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडलं, शेवटच्या भाषणात भावूक, म्हणाले…

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन आता ‘एवढा’ पगार घेणार

(joe biden new immigration bill will beneficial for indian it professionals)