JPMorgan : धक्कादायक, जगातल्या प्रतिष्ठीत बँकेत महिला बॉसकडून ज्यूनियर कर्मचाऱ्यावर सेक्ससाठी जबरदस्ती

खटला दाखल करणाऱ्या तरुणाने एका घटनेचा खास उल्लेख केला आहे. उन्हाळ्याचे दिवस होते, एकदिवस हजनदिनी जबरदस्ती त्याच्या अपार्टमेंटमध्ये आली. त्याने विरोध करुनही त्याच्याशी तिथे जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

JPMorgan : धक्कादायक, जगातल्या प्रतिष्ठीत बँकेत महिला बॉसकडून ज्यूनियर कर्मचाऱ्यावर सेक्ससाठी जबरदस्ती
Lorna Hajdini
Image Credit source: Harvard Business School
| Updated on: May 01, 2026 | 11:53 AM

जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठीत बँकेमध्ये गणना होणार्‍या जेपी मॉर्गन चेस मध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कॉर्पोरेट विश्वातील मोठी पॅकेजेस, आकर्षक लाइफस्टाइल हुरळून टाकते. पण यामागे चालणारा सत्तेचा खेळ आणि पदाच्या दुरुपयोगाचं एक गंभीर प्रकरण समोर आलं आहे. या बद्दल समजल्यानंतर कोणीही हैराण होईल. कॉर्पोरेट विश्वच नाही, तर अन्यत्र सुद्धा आपण पाहिलय की, पुरुषाने महिलेला त्रास दिला, तिचा लैंगिक छळ केला. पण जेपी मॉर्गन चेस मध्ये उलटं घडलं आहे. तिथे एका ज्यूनियर पुरुष कर्मचाऱ्याने आपल्या सीनियर महिला बॉसवर लैंगिक शोषण, ड्रग्स दिल्याचा आणि वर्णद्वेषी टिप्पणीचा गंभीर आरोप केला आहे. त्याने या प्रकरणी खटला दाखल केला आहे.

न्यू यॉर्क काऊंटी सुप्रीम कोर्टात या प्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराला 2024 साली सुरुवात झाली. पीडित व्यक्तीला सुरक्षेच्या कारणामुळे ‘जॉन डो’ हे नाव दिल आहे. पीडित मुलगा आशियाई वंशाचा असून तो वीपी/डायरेक्टर पदावर होता. आरोपी महिला लॉर्ना हजदिनी (37) बँकेच्या लीवरेज्ड फायनान्स डिवीजनमध्ये एग्जीक्यूटिव डायरेक्टर पदावर तैनात होती. तक्रारीनुसार, सोबत काम सुरु केल्यानंतर हजदिनीने पीडित मुलासोबत गैरवर्तन सुरु केलं. डेस्कजवळ मुद्दामून पेन पाडायचं, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा अशी सुरुवात झाली. पीडित मुलाने लॉर्नाच्या या कृत्यांना विरोध केला. तिने अनेकवेळा निमंत्रण दिलं पण ते धुडकावलं. लॉर्नाने पीडित मुलाला त्याचं करियर बरबाद करण्याची धमकी दिली. ‘मी तुला विकत घेतलय’ असं ती त्याला स्पष्टपणे बोलली.

अनेकवेळा न सांगता ‘रुफीज’ सारखं औषध दिलं

जस, जसे दिवस पुढे सरकत होते, तशी परिस्थिती अधिक खराब होत गेली. या खटल्यात जे दावे करण्यात आलेत, त्याने तुम्ही हैराण व्हालं. महिला बॉसने त्याला अनेकवेळा न सांगता ‘रुफीज’ सारखं औषध दिलं. जेणेकरुन त्याचं शारीरिक शोषण करता येईल.  ‘जॉन डो’ला रडू कोसळलं. त्यावर तिने त्याला उलटं सुनावलं व ‘करी’ सारख्या शब्दांचा वापर करुन वर्णद्वेषी टिप्पणी केली.

तिच्या शारीरिक गरजा पूर्ण कराव्या लागतील

पीडित तरुणाचं सर्व करियर तिच्या हातात आहे, याची ती त्याला सतत जाणीव करुन देत होती. सप्टेंबर 2024 मध्ये हजनदिनीने ‘जॉन डो’ वर दबाव टाकला. तुला मॅनेजिंग डायरेक्टरच पद आणि बोनस हवा असेल, तर तिच्या शारीरिक गरजा पूर्ण कराव्या लागतील. मॅनेजमेंटला कुठल्या ब्राऊन बॉयला लीड करताना पहायचं नाही, ती त्याचं प्रमोशन रोखू शकते अशी धमकी दिली. जेपी मॉर्गनच्या प्रवक्त्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हजदिनी अजूनही बँकेत काम करतेय.

Follow Us