Jyoti Malhotra : दानिश नव्हे या अधिकाऱ्यासाठी ज्योती मल्होत्राची 3 वेळा पाकिस्तान वारी

हरियाणाची युट्यूबर आणि पाकिस्तानासाठी हेरगिरी करणारी ज्योती मल्होत्रा हिच्या अटकेनंतर, आणखी एका पाकिस्तानी राजदूताची देशातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी मुझम्मिल देखील भारताची हेरगिरी करण्यात सहभागी होता, असे मानले जाते. ज्योती हा दानिश तसेच मुझम्मिलच्या संपर्कात होती अशा चर्चा आहेत.

Jyoti Malhotra : दानिश नव्हे या अधिकाऱ्यासाठी ज्योती मल्होत्राची 3 वेळा पाकिस्तान वारी
ज्योती मल्होत्रा केस
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: May 22, 2025 | 2:25 PM

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी आणि यूट्यूबर ज्योति मल्होत्राला हरियाणीताली हिसारमधून गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे. सध्या ती पोलिसांच्या ताब्यात असून चौकशीतून रोज नवनवे खुलासे होत आहेत. याचदरम्यान, हेरगिरीमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली भारताने मंगळवारी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील आणखी एका कर्मचाऱ्याला हद्दपार केले. पाकिस्तानी राजदूत मुझम्मिल यांना 24 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेरगिरीचा आरोप असलेली ज्योति मल्होत्रा ही दानिशसोबत मुझम्मिलच्यादेखील संपर्कात होती अशी चर्चा आहे. दोन्ही देशांमधील वाढत्या तणावादरम्यान ही दुसरी हकालपट्टी आहे. तसेच, आतापर्यंत सुरक्षा यंत्रणांनी ज्योतीसह ५ हेरांना अटक केली आहे. मुझम्मिलला ‘पर्सोना नॉन ग्राटा’ घोषित केल्यानंतर, हेरगिरीतील त्याच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Jyoti Malhotra : पाकची हेर ज्योती मल्होत्राची 4 वेळा मुंबईवारी, गर्दीच्या ठिकाणी जाऊन…

मुजम्मिलने कशी केली ज्योतीची मदत ?

राजनैतिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  हद्दपार झालेले रहीम आणि मुझम्मिल हे अधिकारी नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात व्हिसा सहाय्यक म्हणून काम करत होते. त्या दोघांनीही ज्योती मल्होत्राला पाकिस्तानचा व्हिसा मिळवून देण्यात मदत केली, असे मानले जाते.

ज्योती मल्होत्रा ही आत्तापर्यंत 3 वेळा पाकिस्तानला जाऊन आली आहे. तिथे तिने तिच्या व्हिडिओद्वारे पाकिस्तानची सकारात्मक बाजू दाखवली. या प्रवासादरम्यान ती पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आली आणि नंतर भारताची गुप्त तसेच संवेदनशील माहिती त्यांना पाठवली असा आरोप तिच्यावर आहे.

 

Jyoti Malhotra : 20 हजारांचा जॉब पण घर… ज्योती मल्होत्राने किती पैशांत विकलं ईमान ?

पहलगाम हल्ल्यानंतर तणाव

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. ऑपरेशन सिंदूर राबवून भारताने पाकिस्तानला धडा शिकवला, अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत दहशतवाद्यांना ठार केलं. त्यानंतर पाकने केलेा प्रत्येक हल्ला रोखत, चोख प्रत्युत्तरही दिलं. याशिवाय दोन्ही देशांच्या दूतावासांमधील कर्मचारीही कमी करण्यात आले आहेत. भारतीय सुरक्षा संस्था या कोणत्याही देशविरोधी कारवायांवर लक्ष ठेवून आहेत आणि त्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करत आहेत.