AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खामेनेईनंतर इराणचा सुप्रीम लीडर कोण? 3 नावे सर्वात आघाडीवर; कशी होते निवड?

आयातुल्ला अली खामेनेईंच्या निधनानंतर इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाची जागा रिक्त झाली आहे. पुढील सुप्रीम लीडर कोण असेल यावर चर्चा सुरू आहे. आयातुल्ला अराफी, मोहसीन कोमी आणि गुलाम हुसेन एजई ही तीन प्रमुख नावे आघाडीवर आहेत. असेंबली ऑफ एक्सपर्ट्सद्वारे (88 सदस्य) सर्वोच्च नेत्याची निवड केली जाते. हा बदल 1979 च्या क्रांतीनंतरचा इराणमधील दुसरा महत्त्वाचा सत्ता बदल असेल, ज्याचे जागतिक राजकारणावर परिणाम होतील.

खामेनेईनंतर इराणचा सुप्रीम लीडर कोण? 3 नावे सर्वात आघाडीवर; कशी होते निवड?
Iran Supreme Leader
| Updated on: Mar 01, 2026 | 8:33 AM
Share

Ayatollah Ali Khamenei Successor : अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च लीडर आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. खामेनेई यांची मुलगी, जावई आणि नातू यांनाही ठार करण्यात आलं आहे. म्हणजे खामेनेईंचा वंशच या हल्ल्यात संपवण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे इराणमध्ये हाहा:कार उडाला आहे. खामेनेईच मारले गेल्याने त्यांच्या नंतर इराणचा सुप्रीम लीडर कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. यात तीन नावांचा समावेश आहे. तीन नेते या पदासाठी आघाडीवर आहे. मात्र, अमेरिकेचा आशीर्वाद कोणत्या नेत्याच्या पाठी राहतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आयातुल्ला अली खामेनेई हे 1989 पासून इराणवर अव्याहतपणे सत्ता गाजवत होते. त्यामुळे मध्यपूर्वेत सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे ते एकमेव नेते ठरले होते. आता खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे 1979 नंतरच्या इस्लामी क्रांती नंतरची इराणमधील हा दुसरा सत्ता बदल ठरणार आहे. त्यावेळी रुहोल्लाह खामेनेई यांनी इस्लामी गणराज्याची स्थापना केली होती. रुहोल्लाह खामेनेई यांचा 1989मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर आयातुल्ला अली खामेनेई यांना राष्ट्रपतीपद देण्यात आलं.

अशी होते निवड

इराणच्या संविधानानुसार 88 सदस्यीय असेंबली ऑफ एक्सपर्ट्सद्वारे देशाच्या सर्वोच्च नेत्याची निवड केली जाते. या उमेदवारांची निवड गार्डियन कौन्सिलद्वारे केली जाते. तसेच आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांची निवड देशाचा सर्वोच्च नेता करतो. ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत कडक नियंत्रणात होते.

आयातुल्लाह अलीरेजा अराफी

खामेनेई यांचा उत्तराधिकारी म्हणून आयतुल्लाह अलीरेजा अराफी यांच्याकडे पाहिले जाते. ते एक ज्येष्ठ धार्मिक व्यक्ती आहेत. इराणमधील सर्व मदरशांचं ते नेतृत्व करतात. तसेच गार्जियन कौन्सिल तसेच असेंबली ऑफ एक्सपर्ट्सचे ते सदस्य आहेत. त्यांना देशाच्या सर्वोच्च पदी बसवल्याने एक धार्मिक नेताच पुन्हा सत्तेत येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

होज्जात ओल इस्लाम मोहसीन कोमी

उत्तराधिकाऱ्याच्या स्पर्धेतील दुसरे नाव म्हणजे होज्जात ओल इस्लाम मोहसीन कोमी हे आहे. कोमी हे आयातुल्ला खामेनेईंच्या कार्यालयातील प्रमुख सल्लागार आहेत. तसेच खामेनेईंचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. कोमी यांच्याकडे धार्मिक योग्यता आहे. तसेच संस्थागत अनुभवही आहे.

आयतुल्लाह गुलाम हुसैन मोहसिनी एजई

खामेनेई यांचे वारसदार म्हणून नेहमीच आयतुल्लाह गुलाम हुसैन मोहसिनी एजई यांचं नाव घेतलं जातं. ते इराणच्या न्यायपालिकेचे प्रमुख आहेत. राष्ट्रीय पार्श्वभूमी आणि उच्च सरकारी पदावर असल्याने त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सध्या इराणमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. अशावेळी त्यांचा प्रशासकीय अनुभव देश सावरण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आयतुल्लाह हाशेम हुसैनी बुशहरी हे जुम्मेच्या नमाजाचे नेते आणि असेंबली सदस्य आहेत. तसेच खामेनेईंचे वारसदार म्हणून एका धार्मिक नेत्याचं नावही चर्चेत असल्याचं सांगितलं जात आहे.

Excerpt

आयातुल्ला अली खामेनेईंच्या निधनानंतर इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाची जागा रिक्त झाली आहे. पुढील सुप्रीम लीडर कोण असेल यावर चर्चा सुरू आहे. आयातुल्ला अराफी, मोहसीन कोमी आणि गुलाम हुसेन एजई ही तीन प्रमुख नावे आघाडीवर आहेत. असेंबली ऑफ एक्सपर्ट्सद्वारे (88 सदस्य) सर्वोच्च नेत्याची निवड केली जाते. हा बदल 1979 च्या क्रांतीनंतरचा इराणमधील दुसरा महत्त्वाचा सत्ता बदल असेल, ज्याचे जागतिक राजकारणावर परिणाम होतील.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...