अचानक अॅक्टीव का झाली किम जोंग उनची बहीण? अमेरिकेला थेट धमकी, म्हणाली ‘त्यांना किंमत चुकवावी लागणार’

किम जोंग यो ही उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची सर्वात धाकटी बहीण आहे.2014 मध्ये जेव्हा किम जोंग उन आजारी पडले तेव्हा त्यांच्या जागी किम जोंग यो देशाची सूत्रे हाती घेतली. पण इतक्या दिवस शांत असलेली किम जोंग उन पुन्हा एकदा अॅक्टीव झाली आहे. तिने थेट अमेरिकेवर निशाणा साधला आहे.

अचानक अॅक्टीव का झाली किम जोंग उनची बहीण? अमेरिकेला थेट धमकी, म्हणाली त्यांना किंमत चुकवावी लागणार
Kim Jong Un Sister Sudden Activism, Threat to US & South Korea
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 20, 2025 | 6:27 PM

किम जोंग उनची बहीण किम जोंग यो हिने पुन्हा एकदा तिचे जुने शत्रू अमेरिका आणि दक्षिण कोरियावर निशाणा साधला आहे. गेल्या 23 दिवसांत किमच्या बहिणीने या दोन्ही देशांविरुद्ध विधान करण्याची ही तिसरी वेळ आहे. किमची बहीण ज्या पद्धतीने तिच्या जुन्या आणि सर्वात मोठ्या शत्रूंविरुद्ध विधाने करत आहे त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. 2007 मध्ये उत्तर कोरियाच्या राजकारणात प्रवेश करणारी किमची बहीण बराच काळ पडद्यामागे होती. अॅक्टीव नव्हती.

किम जोंग यो यांचे 23 दिवसांत 3 मोठे विधाने

पहिलं विधान- याची किंमत अमेरिकेला चुकवावी लागेल. 

28 जुलै रोजी किम जोंग उनची बहीण किम जोंग यो हिने अमेरिका आणि दक्षिण कोरियाविरुद्ध विधान केले. योंग जो म्हणाली की जेव्हा अमेरिका आपण एक अण्वस्त्रसंपन्न देश आहोत हे मान्य करेल तेव्हाच आम्ही बोलू. किमच्या बहिणी म्हणाली की उत्तर कोरिया आपली अण्वस्त्रे नष्ट करणार नाही. अमेरिकेने काहीही म्हटले तरीही. तसेच यावेळी किम जोंग यो यांनी दक्षिण कोरियाच्या सीमेवरील अमेरिकेच्या लष्करी सरावांवरही निशाणा साधला. किमच्या बहिणीने म्हटले की अमेरिका उत्तर कोरियाला चिथावणी देत आहे. याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. असं म्हणत तिने अमेरिकेला थेट चॅलेंज दिल आहे.

दुसरं विधान- दक्षिण कोरियासोबत शांततेबद्दल कोणतीही चर्चा होणार नाही.

14 ऑगस्ट रोजी किम जोंग यांच्या बहिणीने पुन्हा दक्षिण कोरिया आणि अमेरिकेबाबत विधान केलं. किम यांच्या बहिणीने सांगितले की दक्षिण कोरिया आमच्याविरुद्ध प्रचार करत आहे. दक्षिण कोरियाविरुद्ध कोणताही प्रचार करणारा कोणताही लाऊडस्पीकर आमच्या ठिकाणाहून हटवण्यात आलेला नाही. खरं तर, दक्षिण कोरियाच्या लष्करप्रमुखांनी असा दावा केला होता की उत्तर कोरिया करारानुसार लाऊडस्पीकर देखील काढून टाकत आहे. किमच्या बहिणीने ते खोटे म्हटले. तिने सांगितले की दक्षिण कोरियासोबत शांततेबद्दल कोणतीही चर्चा होणार नाही.

तिसरं विधान- अमेरिकेच्या लष्करी सरावांचा निषेध केला

20 ऑगस्ट रोजी किम जोंग यो यांनी पुन्हा दक्षिण कोरिया आणि अमेरिकेवर निशाणा साधला आहे. किमच्या बहिणीने दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या लष्करी सरावांचा निषेध केला आहे. तिने असेही म्हटले आहे की उत्तर कोरियाच्या डिप्लोमेसी निर्णयात सियोलची कोणतीही भूमिका राहणार नाही.

जोंग यू अचानक सक्रिय का झाली?

किम जोंग यो ही उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची सर्वात धाकटी बहीण आहे. 37 वर्षीय योने 2007 मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी किम जोंग यो 17 वर्षांचे होते. 2014 मध्ये जेव्हा किम जोंग उन आजारी पडले तेव्हा त्यांच्या जागी किम जोंग योने देशाची सूत्रे हाती घेतली.

बहिणीनंतर आता किम जोंग उनची मुलगीही राजकारणात 

किम जोंग यो त्यांच्या भावाचा उत्तराधिकारी मानली जाते. परंतु अलिकडच्या काळात हुकूमशहा किम जोंग उन यांनी त्यांच्या मुलीलाही राजकारणात सक्रिय केले आहे. किम जोंग उन यांची 14 वर्षांची मुलगी उत्तर कोरियाच्या राजकारणात सतत सक्रिय असलेली पाहायला मिळते.

भाचीच्या राजकारणातील सक्रिय सहभागामुळे किम जोंग यो अडचणीत

भाचीच्या राजकारणातील सक्रिय सहभागामुळे किम जोंग यो देखील अडचणीत आल्याचे बोलले जात आहे. तथापि, आतापर्यंत उत्तर कोरियाच्या सरकारने किंवा किम कुटुंबाने उत्तराधिकाराच्या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. किम जोंग योच्या कारवाया देखील उत्तराधिकाराशी जोडल्या जात आहेत. कारण जोंग यो सतत तिचे जुने शत्रू दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला लक्ष्य करत आहे.