
इस्रायलचे स्वप्न आता पूर्ण झाले असून नेतन्याहू यांनी वेस्ट बँकच्या एक पाऊल पुढे टाकले. जो वादाचा मुद्दा होता तोच मार्गी काढण्यात आला. पॅलेस्टाईनला पूर्णपणे नष्ट करणारा निर्णय घेतला आहे. इस्रायलच्या पंतप्रधानांनी थेट E1 वसाहत विस्तार योजनेवर सही केलीये. इस्त्रायलच्या भूमिकेकडे संपूर्ण जगाच्या नजरा होत्या. युद्ध पेटण्याचे संकेत असतानाच मोठा गेम इस्त्रायलने केलाय. यामुळे आता पश्चिम किनाऱ्याच्या या विशेष भागात नवीन घरे बांधली जातील. भविष्यात देखील पॅलेस्टाईनची शक्यता संपणार आहे. तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल सुरू असतानाच हे घडल्याने संपूर्ण जगाने सुटकेचा निश्वास घेतलाय.
पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की, फिलिस्तीन हे राज्य राहणार नाही. आम्ही येथे हजारो नवीन घरे बांधणार आहोत आणि लोक त्यामधील राहतील. विशेष म्हणजे नेतन्याहू यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे या भागात इस्रायली लोकवस्तीची संख्या वाढेल. पॅलेस्टाईनवर आधीच वाढणारे हल्ले आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होण्याच्या घटनांमध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे. मुळात म्हणजे हा भाग अत्यंत संवेदनशील मानला जातो.
येथे नवीन प्लॉट राहण्यासाठी बांधल्याने इस्रायल जेरुसलेमला वेस्ट बँकशी जोडू शकते, ज्यामुळे भविष्यातील फिलिस्तीन राज्याची शक्यता संपुष्टात येऊ शकते. फिलिस्तीन आणि जगातील बहुतेक देशांना वाटते की, हा इस्रायलचा पॅलेस्टिनी भूभाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. हेच नाही तर पंतप्रधान नेतन्याहू यांनी स्पष्ट केले की, पॅलेस्टाईन कोणतेही राज्य राहणार नाही. आम्ही येथे हजारो नवीन घरे बांधणार आहोत आणि त्यात लोक राहण्यासाठी जातील. मुळात म्हणजे विषय असा होता की, आतापर्यंत फक्त हमासच इस्रायलसोबत युद्ध करत होता.
आता त्यामध्ये फिलिस्तीनीही उडी घेतली होती. ते थेट रस्त्यावर उतरून निदर्शने करत होते आणि त्यांची निदर्शने अधित तीव्र आणि हिंसक होण्याची शक्यता होती. अरब देश आणि युरोपियन युनियनच्या शांततेसाठी प्रयत्न करत होती. मात्र, इस्रायलला कोणाचाही हस्तक्षेप मान्य नव्हता. या वादात अमेरिकेनेही उडी घेतली होती. अमेरिका इस्रायलवर दबाव टाकताना देखील दिसली. डोनाल्ड ट्रम्प यांनी या तणावात काही धमक्या देखील दिल्या होता. शेवटी इस्त्रायलने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह काही देशांना तोंडावर पाडत थेट मोठा निर्णय घेतला.