AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला मोठा दणका! रशियाकडून तेल खरेदी बंद करावीच लागेल, अमेरिकेकडून पुन्हा धमकी, डोनाल्ड ट्रम्प थेट..

America Tariff : टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सहकाऱ्यांकडून भारताला धमकावले जातंय. आता परत एकदा टॅरिफच्या मुद्द्यावरून मोठी धमकी देण्यात आलीये.

भारताला मोठा दणका! रशियाकडून तेल खरेदी बंद करावीच लागेल, अमेरिकेकडून पुन्हा धमकी, डोनाल्ड ट्रम्प थेट..
Donald Trump
| Updated on: Sep 12, 2025 | 7:35 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले आहेत. हेच नाही तर व्यापार चर्चा देखील बंद असल्याचे सांगितले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार हे भारताबद्दल वागद्रस्त विधाने करताना देखील दिसले. मात्र, परत डोनाल्ड ट्रम्प यांनी पलटी मारत भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक करत दोन्ही देशातील अनेक वर्षांची मजबूत संबंध असल्याचे त्यांनी म्हटले. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या व्यापार चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. पुढच्या महिन्यातील नरेंद्र मोदी यांनी त्यांचा अमेरिका दाैरा रद्द केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मी नरेंद्र मोदी यांना भेटण्यास इच्छुक असल्याचेही थेट म्हटले होते.

आता याचदरम्यान भारताचे पुढचे अमेरिकी राजदूत सर्जिया गोर यांनी भारत आणि अमेरिकेतील टॅरिफच्या तणावाबद्दल मोठे विधान केले. त्यांनी म्हटले की, टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेत जास्त तणाव नक्कीच नाहीये. पुढच्या काही आठवड्यात दोन्ही देशांमध्ये व्यापार चर्चा होईल आणि ज्याकाही समस्या आहेत, त्या दूर केल्या जातील. मात्र, यादरम्यान बोलताना गोर यांनी स्पष्ट सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताला रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करावे लागेल.

पुढे बोलताना गोर म्हणाले, ब्रिक्समधील विविध मुद्द्यावर भारताने आम्हाला साथ दिली आहे. भारत आणि अमेरिकेत रणनीती अत्यंत महत्वाची आहे. भारत आणि अमेरिका मिळून जगाची दिशा ठरवून शकते. आमच्यासमोर बरेच असे मुद्दे आहेत, ज्यामध्ये दोन्ही देशांना मिळून काम करायचे आहे. मात्र, गोर यांनी स्पष्ट सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार भारताला रशियाकडून तेल खरेदी बंद करावी लागेल.

भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता भारतावर सातत्याने दबाव हा टाकला जातोय. मात्र, भारत हा रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवत असल्याने अमेरिकेचा थयथयाट सुरू आहे. भारताने स्पष्ट सांगितले की, आमची मर्जी आम्ही कुठूनही तेल खरेदी करू शकतो. तुम्हाला नसतील भारतीय वस्तू खरेदी तर नका कर. मागील काही वर्षांचे चांगलेच संबंध या टॅरिफवरून ताणल्याचे बघायला मिळतंय.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.