AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Giorgia Meloni : सौंदर्य, निखळ हास्यामागे बराच संघर्ष, जॉर्जिया मेलोनीच्या आयुष्याची दुसरी बाजू काय?

Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ, मीम्स व्हायरल होत आहेत. इटलीत G7 परिषद होत आहे. पण त्या बद्दल भारतात बरीच चर्चा आहे. भारताचा सोशल मीडिया जॉर्जिया मेलोनी यांनी व्यापून टाकलाय. असं काय आहे या व्यक्तीमत्वामध्ये जाणून घ्याय.

Giorgia Meloni : सौंदर्य, निखळ हास्यामागे बराच संघर्ष, जॉर्जिया मेलोनीच्या आयुष्याची दुसरी बाजू काय?
giorgia meloni
| Updated on: Jun 14, 2024 | 12:25 PM
Share

राजकारण पुरुषांच क्षेत्र आहे हा समज मोडून काढत जॉर्जिया मेलोनी वर्ष 2022 मध्ये इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. मेलोनी यांनी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनून इतिहास रचलाच. पण वयाच्या 31 व्या वर्षी मंत्री बनून सुद्धा त्यांनी इतिहासात नाव नोंदवलं होतं. अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करणाऱ्या मेलोनी यांचं आयुष्य इतक सोप नव्हतं. पीएम मेलोनी यांनी पक्ष बनवण्यापासून ते पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास एकटीने केलाय. जॉर्जिया मेलोनीचा जन्म इटलीची राजधानी रोममधील गारबेटेला येथे वर्ष 1977 मध्ये झाला.

जॉर्जिया मेलोनी यांच्या राजकीय आयुष्याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहितीय. मागच्या वर्षी जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या आत्मकथेतून आयुष्याची काही पान जगासमोर उलगडली. मेलोनी यांनी बार टेंडरची सुद्धा नोकरी केलीय. अनेक अडचणींवर मात करुन त्या इटलीच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचल्या आहेत.

‘अबॉर्शन करायच होतं’

माझं जन्माला येण ही साधी गोष्टी नव्हती, असं मेलोनी यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे. मेलोनी यांच्या आईला अबॉर्शन करायच होतं. त्या गर्भपाताच्या निर्णयापर्यंत पोहोचल्या होत्या. पण अखेरीस आईचा निर्णय बदलला व मेलोनी यांचा जन्म झाला. मेलोनी यांची आई कांदबरीकार आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी मुलीचा आत्मविश्वास वाढवला. जन्माला आल्यानंतर मेलोनी यांच आयुष्य सोप नव्हतं. वडिल कामाच्या सिलसिल्यात आई आणि बहिणीला सोडून गेले. ते पुन्हा कधीच परतून आले नाहीत.

बार काऊंटरच्या पाठीमागे आयुष्याचे धडे

पीएम मेलोनी यांनी लहान वयातच घराची जबाबदारी उचलायला सुरुवात केली. मेलोनी घर खर्चामध्ये आई आणि बहिणीला मदत करायची. मेलोनी यांनी नाइट क्लबमध्ये बारटेंडरच कामही केलं. पीएम मेलोनी एकदा त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल बोलल्या. “मी संसदेत काम करुन आयुष्याबद्दल शिकली नाही. बार काऊंटरच्या पाठीमागे मला आयुष्याचे धडे मिळाले” असं मेलोनी म्हणाल्या.

राजकीय करियरला सुरुवात कधी?

जॉर्जिया मेलोनी यांच्या राजकीय करियरला वर्ष 1992 मध्ये सुरुवात झाली. ते इटालियन सोशल मूवमेंट, एमएसआयच्या युवा शाखेत सहभागी झाल्या. वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी खासदार बनून 2006 मध्ये त्या संसदेत पोहोचल्या. 2 वर्षांनी त्या इटलीच्या सर्वात कमी वयाच्या मंत्री बनल्या.

त्यांनी तिसरा मार्ग निवडला

2011 मध्ये बर्लुस्कोनी यांचं सरकार कोसळल्यानंतर मेलोनी यांच्याकडे तीन ऑप्शन होते. पहिलं म्हणजे बर्लुस्कोनीला साथ देणं, दुसरं राष्ट्रीय आघाडीला मजबूत बनवण्यासाठी समर्थन देणं आणि तिसरा स्वत:चा पक्ष बनवणं. त्यांनी तिसरा मार्ग निवडला व स्वत:चा पक्ष स्थापन करुन इटलीच्या पंतप्रधान बनल्या.

लग्न न करता मुलीला जन्म दिला

मेलोनी सिंगल मदर आहेत. देशाच्या पंतप्रधान असण्याबरोबर मेलोनी महिलांच्या प्रेरणा स्त्रोत आहेत. सिंगल मदर मुल संभाळण्याबरोबर देश संभाळू शकते हा संदेश त्यांनी दिला. मेलोनी यांची मुलगी जिनेवराचा जन्म वर्ष 2016 मध्ये झाला. मेलोनी यांनी आपल्या पुस्तकात जिनेवराच्या पित्याचा उल्लेख केलाय. पत्रकार एंड्रिया जियाम्ब्रुनो यांच्याबरोबर मेलोनी रिलेशनशिपमध्ये होत्या. एक इंटरव्यू दरम्यान मेलोनीची एंड्रिया जियाम्ब्रुनो बरोबर ओळख झाली होती. दोघांनी लग्न केलं नाही. 10 वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघे वेगळे झाले.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.