पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीला महाराष्ट्र एटीएसचा दणका, तब्बल 9 ठिकाणी छापे, समर्थन देणाऱ्या..
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी भारतात पाय पसरवताना दिसत आहे. त्याने भारतात आपले नेटवर्क वाढवण्यास सुरूवात केली. यादरम्यानच काही दहशतवादी भरतींमध्ये त्याचे नाव पुढे आले. यादरम्यानच आता त्याला मोठा दणका देण्यात आला.

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी सध्या भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे. शहजाद भट्टी गँग आणि डोगर गँगशी संबंधित महाराष्ट्र ATS ने मोठी कारवाई केली. इंटरनेटच्या जगात हिरो बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारदतीय तरुणांना याची कल्पनाही नसेल की, ते नक्की कोणत्या लोकांसोबत जोडले जात आहेत. पाकिस्तानी शहजाद भट्टी दुबईतून एक नेटवर्क चालवत आहे. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांना कट्टरतावाद आणि हेरगिरीच्या दलदलीत ढकलत आहे. तो अगदी सहजपणे तरुणांना यात ओढत आहे. तरुणांनाही याची कल्पना नाही की, ते नक्की काय करत आहेत. आता शहजाद भट्टीची उलटगणती सुरू झाली. महाराष्ट्र एटीएसच्या निशाण्यावर तो आहे. आज राज्यातील विविध शहरांमध्ये महाराष्ट्र एटीएस छापे टाकत मोठी कारवाई केली. ज्याने एकच खळबळ उडाली. आज सकाळी 8 वाजल्यापासून राज्यभरात एटीएसकडून छापेमारी सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई, पुणे नालासोपारा, मीरारोड, नागपूर, अकोला, नांदेड, नाशिक आणि जळगाव येथे ATS ची धाड सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या गँगस्टर्सशी जोडलेले किंवा त्यांना समर्थन देणाऱ्या व्यक्तींची एटीएसकडून चौकशी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील गँगस्टर नेटवर्क मोडीत काढण्यासाठी ही मोठी धडक कारवाई केली जात आहे.
राज्यातील काही तरुण या गँगस्टरच्या टोळीच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. हा भट्टी मुळ पाकिस्तानातील लाहोर येथील रहिवासी आहे. मात्र, सध्या तो दुबईत राहून गँग चालवत आहे. भारतातील तरुणांना कट्टरतावाद आणि हेरगिरीमध्ये तो ढकलत आहे. याबाबत अधिकची माहिती मिळताच धडक कारवाई केली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढले जात आहे.
शहजाद भट्टी याच्यासोबत सोशल मीडियावर संपर्कात असणाऱ्यांची चाैकशी होईल. गेल्या काही महिन्यांत भारतातील दहशतवादी भरती किंवा हेरगिरी संबंधित काही प्रकरणात थेट शहजाद भट्टी याचे नाव वारंवार पुढे येत आहे. ज्यानंतर ही थेटपणे कारवाई केली जात आहे. शहजाद भट्टी याची भारतावर वाकडी नजर आहे. तो भारतात आपले नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.