
इराण आणि अमेरिका युद्ध पेटलेले असतानाच एक अत्यंत मोठी बातमी पुढे येताना दिसत आहे. न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळावर एक मोठा अपघात झाला. या अपघातानंतर मोठी खळबळ उडाली. एअर कॅनडा एक्सप्रेसचे विमान विमानतळावर उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकले. ही धडक अत्यंत भयंकर असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे. अपघातानंतर लगेचच बचावकार्य राबवण्यात आल्याची माहिती कळतंय. अपघातानंतर लगेचच जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात अत्यंत भयंकर असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर विमानतळावर मोठा आवाज झाल्याचेही सांगितले जात आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने एक सूचना जारी केली.
भीषण अपघातानंतर सर्व उड्डाणे रद्द
सर्व उड्डाणे थांबवण्यात आली. विमानतळाहून कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही. एअर कॅनडा एक्सप्रेसच्या एका विमानाने विमानतळावर उभ्या असलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीला मोठी धडक दिली. ही धडक दिल्यानंतर काही वेळ विमानतळावर तणावाचे वातावरण बघायला मिळाले. मोठा गोंधळ उडाला. कोणालाही काहीच कळत नव्हते.
जखमींवर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू
या अपघातानंतर ला गार्डिया विमानतळाकडे जाणारी विमाने इतर विमानतळांकडे वळवण्यात आली. उड्डाणासोबतच येणाऱ्या विमानांनी रोखण्यात आले. या विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. या व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओवरून स्पष्ट झाले की, अपघात किती भंयकर होता.
विमान अपघातानंतर धक्कादायक माहिती पुढे
ऑक्टोबर 2025 मध्ये या विमानाचा मोठा अपघात झाला होता. डेल्टा एअरलाईन्सची दोन विमाने टॅक्सीवेवर एकमेकांवर आदळली, ज्यात एका विमानाचा पंख दुसऱ्या विमानाच्या कॉकपिटला धडकला. त्यामध्येच आता पुन्हा हा अपघात झाला आहे. अपघातात जखमी झालेल्या लोकांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या अपघातामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. अपघातानंतर लगेचच बचावकार्य राबवण्यात आले. या अपघातात नेमके किती लोक जखमी झाले, याबाबत माहिती मिळू शकली नाहीये.