AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hormuz Open : होर्मुज खाडी खुली… इराणचा मोठा दावा, थेट म्हटले, धमकी नाहीच तर…

Hormuz Open : इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडीचा मुद्दा गाजत आहे. 48 तासाचा वेळ अमेरिकेकडून इराणला दिला आहे. यादरम्यानच आता इराणकडून यावर मोठे भाष्य करत नक्की परिस्थिती काय आहे हे स्पष्टपणे सांगण्यात आले.

Hormuz Open : होर्मुज खाडी खुली... इराणचा मोठा दावा, थेट म्हटले, धमकी नाहीच तर...
Iranian Foreign Minister Abbas Araghchi
| Updated on: Mar 23, 2026 | 10:49 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध एका घातक वळणावर आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी युद्धाला सुरूवात झाली. युद्ध सुरू होताच होर्मुज खाडीत मोठा जाम लागला. एकही जहाज पुढे जाताना दिसत नाही. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश संकटात आहेत, त्याचे मुख्य कारण म्हणजे एलपीजी गॅस आणि कच्च्या तेलाकरिता हा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. हाच मार्ग बंद असल्याने जगातील अनेक देश तणावात असून आणीबाणी लागण्याची वेळ आली. जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. होर्मुज खाडी पुन्हा सुरू करण्याकरिता अमेरिकेकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. पण अमेरिकेला अजिबातच यश मिळत नाही. त्यामध्येच आता अमेरिकेने थेट होर्मुजमध्ये अमेरिकन लष्कर उतरवणार असल्याचे म्हटले. होर्मुज खाडी सुरू करण्याकरिता इराणला अमेरिकेने 48 तासाचा वेळ दिला. जर इराणने असे केले नाही तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले केले जाणार असल्याची धमकी अमेरिकेने दिली.

यादरम्यान इराणकडून स्पष्ट करण्यात आले की, आम्ही कोणाच्याही दबावापुढे अजिबात झुकणार नाहीत. यादरम्यानच इराणकडून सांगण्यात आले की, आमच्याकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली नाही. इराणचे विदेश मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले की, ना कोणती विमा कंपनी नाही इराण या धमकींना घाबरत नाही. सरळ आणि सोपा मार्ग आहे की, तुम्ही सन्मानजनक भाषा बोला.

यादरम्यान अराघची यांनी स्पष्ट केले की, होर्मुज खाडी बंद नाहीये. हा पण नक्कीच युद्धामुळे तिथे स्थिती सामान्य नाहीये. त्यामुळे जहाज तिथून जाण्यास पुढे येत नाहीत. यादरम्यान बोलताना इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, होर्मुज खाडीतून जहाज येत आणि जात आहेत. पण आता सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शत्रू देश आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या देशांचे जहाज रोखले जात आहेत.

होर्मुज खाडीतून जाताना काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. यादरम्यानच इराणकडून आत्मरक्षेच्या अधिकाराबद्दल सांगताना होर्मुज खाडीचा वापर आपल्याविरोधात होऊ देणार नसल्याचेही सांगण्यात आले. इराण आणि अमेरिकेच्या युद्धात होर्मुज खाडीचा मुद्दा तूफान चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे. होर्मुज खाडीच्या मुद्द्यावरून अमेरिकेने तांडव करण्यास सुरूवात केली.

Follow Us
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल