अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये एकच हाहाकार! इराणचे खळबळ उडवणारे पाऊल, थेट ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्या..
इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले आहे. यादरम्यानच धक्कादायक माहिती पुढे येत आहे. इराणकडून असे एक पाऊल उचलण्याची तयारी सुरू आहे, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. थेट संसदेत याबाबतचे विधेयक सादर केले जाणार आहे. ज्याने अमेरिका आणि इस्त्रायलला दणका बसलाय.

इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगाला बसत आहे. जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आहे. अमेरिका मोठा लष्करी हल्ला इराणवर करण्याच्या तयारीत होती. जवळपास सर्वच तयारी झाली. यादरम्यानच आखाती देशांनी अमेरिकेला हे करण्यापासून रोखले. इराणसोबत चर्चा एका वेगळ्या आणि महत्वपूर्ण टप्प्यात आहे. जर तुम्ही हल्ला केला तर परिस्थिती चिघळू शकते, यामुळे लष्करी हल्ला थांबवावा, अशी विनंती अमेरिकेला साैदी अरेबिया, कतार आणि युएईने केली. ज्यानंतर अमेरिके लष्करी कारवाई थांबवली. 12 आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून इराण अमेरिका युद्ध सुरू आहे. मात्र, काही मार्ग निघू शकत नाही. अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही, अशा पद्धतीने इराण युद्ध लढत आहे. इराण अजिबात हार मानत नाही. इराण इतक्या धक्कादायक पद्धतीने अमेरिकेला उत्तर देईल, असे कोणालाही वाटले नाही.
अमेरिकेची पूर्ण व्यवस्थित योजना होती. या योजनेत थेट इराणच्या सर्वाेच्च नेत्याला ठार करायचे आणि पहिला हल्ला यशस्वी करायचा. सर्वाच्च नेत्यांच्या निधनानंतर इराण एक दोन आठवड्यांशिवाय अधिक काळ लढू शकणार नाही, हे अमेरिकेला पक्के माहिती होते. मात्र, तिथेच अमेरिकेची मोठी चूक झाली. सर्वाेच्च नेत्याला अमेरिकेने ठार केल्यानंतरही इराण अजूनही खंबीरपणे उभा आहे.
अमेरिकेच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर देत आहे. त्यामध्येच आता इराणमधून झोप उडवणारी माहिती पुढे येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची हत्या करणाऱ्यांना 5 अब्ज रुपयांपेक्षा जास्त बक्षीस देणारे विधेयक थेट इराणची संसद सादर करू शकते, अशा हालचाली देखील सुरू करण्यात आल्यात. ज्याने एकच खळबळ उडाली.
‘द टेलिग्राफ’मधील एका वृत्तानुसार, इराणी संसदेचा राष्ट्रीय सुरक्षा आयोग हे विधेयक तयार करत आहे. आयोगाचे प्रमुख इब्राहिम अझीझी यांनी या विधेयकाबद्दल बोलताना म्हटले की, इस्लामिक प्रजासत्ताकाच्या लष्करी आणि सुरक्षा दलांकडून प्रतिशोध या शीर्षकाखाली तयार केले जात आहे. लवकरच हे संसदेत सादर होईल. अमेरिका इतके मोठे हल्ले करत असतानाही इराण अजिबात माघार घेत नाहीये आणि अमेरिकेपुढे झुकत नाहीये.