जग हादरलं! इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, फक्त इस्त्रायल, अमेरिकाच नाही तर थेट…

अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते, असे सांगितले जात होते. दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला होता. यादरम्यानच आता खळबळ उडवणारी माहिती पुढे येत असून जग तणावात आले.

जग हादरलं! इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, फक्त इस्त्रायल, अमेरिकाच नाही तर थेट...
Ballistic Missile Khorramshahr
| Updated on: Feb 06, 2026 | 1:14 PM

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे जगाचे टेन्शन वाढले. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करू शकते, असे सांगितले गेले. इराणच्या दिशेने अमेरिकेने एक पाऊस पुढे टाकले. यादरम्यानच इराणने थेट अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला तर हल्ला करणाऱ्याचे हात कापू आणि पूर्ण जगाला उद्धवस्थ करू असे थेट म्हटले. अमेरिका आणि इराणमधील तणाव फक्त दोन देशांसाठीच नाही तर जगासाठी घातक असल्याचे पुढे आले. इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवरही मोठा टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय अमेरिकेने घेतला. इराण सरकारविरोधात लोक रस्त्यावर उतरले होते आणि याच आंदोलन करणाऱ्या लोकांना पाठबळ देताना अमेरिका दिसली. अमेरिकेच्या भूमिकेमुळे इराणमध्ये इंटरनेटही बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता आणि आमच्या घरातील गोष्टींमुळे कोणी बाहेरच्या हस्तक्षेप केला तर ते सहन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

आता इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवल्याचे बघायला मिळत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने एक नवीन भूमिगत क्षेपणास्त्र सिटी बांधले आहे. खोरमसिटी-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र देखील पूर्णपणे तैनात केले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिका आणि इस्त्रायलने मिळून इराणमधील अणुस्थळे उद्धवस्थ केली होती. यादरम्यानच ही मोठी बातमी पुढे येत आहे.

भूमिगत क्षेपणास्त्र  2000 किलोमीटरचा पल्ला आणि 1500 किलोग्रॅम वजनाचे वॉरहेड असलेल्या या क्षेपणास्त्राने इराणची लष्करी शक्ती लक्षणीयरीत्या वाढवली आहे. हे क्षेपणास्त्र मध्य पूर्वेतील अनेक देश, इस्रायल आणि युरोपच्या काही भागांना टार्गेट करू शकते. फक्त हेच नाही तर अमेरिकन तळांनाही. 1500 किलो हे जड वॉरहेड मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

इराणने या क्षेपणास्त्राचा उल्लेख प्रमुख शस्त्र म्हणून केला आहे. फक्त संरक्षणासाठीच नव्हे तर जलद प्रतिहल्ला करण्यासाठी देखील वापरले जाईल. इराणच्या या क्षेपणास्त्रमुळे जगाची झोप उडाली आहे. मोठा हल्ला करण्याची याची क्षमता आहे. अमेरिकेचे अध्यक्ष सतत इराणला धमक्या देताना दिसत आहेत. त्यामध्येच इराणने आपली नक्की काय ताकद आहे, हे जगाला दाखवून दिले.