
ऑस्ट्रेलियातील सिडनीतील बॉन्डी बीचवर धक्कादायक घटना घडली. चक्क तीन दहशतवाद्यांनी बेधुद्ध गोळीबार केला. या गोळीबारात तब्बल 16 जणांचा जीव गेला. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केला. या हल्ल्याची हैराण करणारी काही व्हिडीओ पुढे आली. तिन्ही दहशतवाद्यांचा हातात बंदुकी होत्या आणि दिसेल त्याला गोळ्या झाडत हे निघाले होते. खळबळजनक गोष्ट म्हणजे दोन जण पाकिस्तानी नागरिक होते. त्यांच्या ऑस्ट्रेलियात फळांचा व्यवसाय होता. यातील एक दहशतवादी ऑस्ट्रेलियातील एका इस्लामी केंद्रात जात असल्याची माहिती पुढे आली. पाकिस्तानी आणि सीरियातील दहशतवादी संघटनांच्या हा संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. यादरम्यान चक्क दहशतवाद्यावर झडप टाकून त्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेण्याची हिंमत एका ऑस्ट्रेलियन नागरिकाने केली.
बॉन्डी बीचवर ज्यावेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू होत्या. त्यावेळी एक व्यक्ती गाड्यांच्या मागे लपून थेट दहशतवाद्यापर्यंत पोहोचले. यावेळी त्याने मागून झडप घातली आणि दहशतवाद्यासोबत झटापट करत थेट त्याच्या हातातील बंदूक हिसकावली आणि त्यानंतर त्याने थेट दहशतवाद्यावर गोळीबार केला. यादरम्यान एका दुसऱ्या दहशतवाद्याने त्या व्यक्तीवर गोळीबार केला. ज्यामध्ये तो जखमी झाला.
This is the verified link for the Bondi hero. I am told by @gofundme that the funds will only be released directly to the hero. https://t.co/2sc5Z1Vut1
— Bill Ackman (@BillAckman) December 14, 2025
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तूफान व्हायरल होत आहे. लोक त्या व्यक्तीचे काैतुक करत असून त्याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दहशतवाद्यासोबत चार हात करणाऱ्या या व्यक्तीचे नाव
अहमद अल अहमद आहे. दरम्यान, अहमदला उपचार आणि मदत पुरवण्यासाठी एक निधी उभारणी मोहीम सध्या सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही मोहिम जी ज्यू अब्जाधीश गुंतवणूकदार विल्यम ॲकमन यांनी सुरू केली आहे.
Ahmed, you are an Australian hero.
You put yourself at risk to save others, running towards danger on Bondi Beach and disarming a terrorist.
In the worst of times, we see the best of Australians. And that’s exactly what we saw on Sunday night.
On behalf of every Australian, I… pic.twitter.com/mAoObU3TZD
— Anthony Albanese (@AlboMP) December 16, 2025
GoFundMe प्लॅटफॉर्मवर चालवल्या जाणाऱ्या या मोहिमेचे एकूण निधी उभारणीचे उद्दिष्ट 3.1 दशलक्ष डॉलर्स आहे. आतापर्यंत 2,068,043 डॉलर जमा करण्यात त्यांना यश मिळाले. भारतीय चलनानुसार, ही रक्कम 17.16 कोटी रुपयांच्या बरोबरीची आहे. विल्यम ॲकमन यांनी स्वत: सुरूवातीलाच या मोहिमेत 99 लाख रूपये जमा केले आहेत. लोक भरभरून मदत करताना दिसत आहेत. पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अहमदच्या भेटीचा व्हिडीओ देखील शेअर केला. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता अहमदने जे धैर्य दाखवले त्याचे काैतुक होत आहे.