बांगलादेशची हिंमत वाढली, थेट भारताकडे दाखवले बोट, आता हे बदलणे..
मागच्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध तणावात आहेत. त्यातच आता मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. बांगलादेशने थेट भारताकडे बोट दाखवले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना हा करार करायचा आहे.

बांगलादेश गेल्या काही दिवसांपासून भारतासोबत पंगे घेताना दिसत आहे. पाकिस्तानसोबत जवळीकता वाढली आहे. त्यातच गंगा जल करारावरून भारताकडे बांगलादेशने बोट दाखवले. बांगलादेशचे जल विशेषज्ञ मंजूर ए. चाैधरी यांनी भारत आणि बांगलादेश यांच्यात 1996 मध्ये गंगा जल करार आता बदलला आहे, त्यात अनेक दोष आहेत. त्यात काही गारंटी नाही. द हिंदूच्या रिपोर्टनुसार, बांगलादेश नॅशनल कंजर्वेशन कमिशनचे माजी अध्यक्ष मंजूर ए. चाैधरी यांनी म्हटले की, गंगा जल करार हा डिसेंबर महिन्यात संपणार आहे. यादरम्यान दोन्ही देशांनी आपत्कालीन करार करायला हवा. सरळ यावर बसून चर्चा करायला हवी. चाैधरी यांच्या म्हणण्यांनुसार, गंगा जल करार हा तब्बल तीन दशके जुना आहे. त्यात काही महत्वपूर्ण गोष्टींचा समावेश नाही. या करारात पर्यावरणाच्या प्रवाहाकडे लक्ष देण्यात आले नाही. जलपरिवर्तनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे या करारात आहे की, पाण्याचे वाटत ठरवले पाहिजे.
कोणत्याही करारात नदीकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. हा करार संपण्यापूर्वी दोन्ही देशांनी सुरूवातीला तात्काळ तीन वर्षांसाठी करार करावा. या काळात मग गंगा जल करार करावा. ज्यात सर्व गोष्टीचा विचार व्हावा. डिसेंबर महिन्यातच हा करार संपत असल्याने वेळ कमी आहे. मुळात म्हणजे भारत आणि बांग्लादेश गंगा जल करार हा दोन्ही देशांच्या व्दिपक्षीय संबंधांवर आधारित आहे.
कमी पाणी असलेल्या महिन्यांमध्ये नेपाळच्या घाघरा, गंडक आणि कोसी नदींचे पाणी गंगा नदीत येते. गंगा नदीची देखरेख करणे आवश्यक असल्याचेही यादरम्यान त्यांनी म्हटले. त्यामुळेच बांगलादेशने या करारात नेपाळलाही सहभागी करण्याची मागणी केली. ढाकातील संमेलनातही त्यांनी हा मुद्दा मांडला होता. सध्यातरी हा करार फक्त भारत आणि बांगलादेशापर्यंतच मर्यादित आहे.
बांगलादेशचे माजी पूर्व विदेश सचिव फारूक सोभान यांनी गंगा जर करारात काही दोष असल्याचे म्हटले होते. भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावात आहेत. त्यातच आता गंगा जल करार तोंडावर आहे. गंगा जल करारात बांगलादेश भारताकडे बोट दाखवताना दिसत आहे.