USA: भारतीय वंशाच्या मथुरा श्रीधरन बनल्या सॉलिसिटर जनरल, मात्र टिकली लावल्याने…

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या वकील मथुरा श्रीधरन या ओहायो येथे सॉलिसिटर जनरल बनल्या आहेत. मात्र आता मथुरा श्रीधरन यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला.

USA: भारतीय वंशाच्या मथुरा श्रीधरन बनल्या सॉलिसिटर जनरल, मात्र टिकली लावल्याने...
mathura-sridharan
| Updated on: Aug 03, 2025 | 10:39 PM

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या वकील मथुरा श्रीधरन या ओहायो येथे सॉलिसिटर जनरल बनल्या आहेत. अ‍ॅटर्नी जनरल डेव्ह योस्ट यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. मात्र यानंतर मथुरा श्रीधरन यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. हे पद अमेरिकन व्यक्तीला का दिले गेले नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर बोलताना डेव्ह योस्ट यांनी मथुरा श्रीधरन एक अमेरिकन नागरिक आहेत आणि त्यांचे पती देखील अमेरिकन नागरिक आहेत त्यामुळे त्यांना पद दिल्याचे स्पष्ट केले.

अ‍ॅटर्नी जनरल डेव्ह योस्ट यांनी ओहायोच्या 12 व्या सॉलिसिटर जनरल म्हणून श्रीधरन यांची निवड केली आहे. X वर पोस्ट करत योस्ट यांनी ही घोषणा केली होती. योस्ट यांनी मथुरा यांचे वर्णन प्रतिभावान वकील म्हणून केले होते. तसेच त्या राज्याची चांगली सेवा करतील असंही म्हटलं होतं.

मथुरा श्रीधरन टिकली लावल्यामुळे ट्रोल

X वरील एका पोस्टमध्ये योस्ट यांनी असेही म्हटले होते की, ‘मथुराने गेल्या वर्षी SCOTUS मध्ये तिचे युक्तिवाद जिंकले. तिने फ्लॉवर्स आणि गॅसर या दोन्ही SGs अंतर्गत काम केले आहे, त्यांनी तिची शिफारस केली होती. ती युक्तिवाद करण्यात माहीर आहे. तिला बढती देण्यासाठी मी उत्सुक होत. ती ओहायोची चांगली सेवा करेल.’

मात्र यानतर श्रीधरन यांना भारतीय असल्यामुळे आणि टिकली लावल्यामुळे वर्णद्वेषी ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एका व्यक्तीने एक्स वर योस्ट यांना म्हटले की, ‘अमेरिकन नसणाऱ्या व्यक्तीला महत्त्वाच्या पदासाठी का निवडता? बघा, टिकली कमकुवत आहे, पण तरीही दिसते.’

मथुरा श्रीधरन कोण आहेत?

मथुरा श्रीधरन यांनी 2018 मध्ये न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लॉमधून कायद्याची पदवी घेतलेली आहे. मथुरा श्रीधरन यांना ओहायोचे अॅटर्नी जनरल डेव्ह योस्ट यांनी ओहायोचे 12 वे सॉलिसिटर जनरल म्हणून बढती दिली आहे. यापूर्वी श्रीधरन यांनी अॅटर्नी जनरल कार्यालयात ओहायो टेन्थ कमांडमेंट सेंटरमध्ये संचालकपदावर काम केलेले आहे.

ओहायो सॉलिसिटर ऑफिसमध्ये काम करण्यापूर्वी, श्रीधरन यांनी यूएस कोर्ट ऑफ अपील्स फॉर द सेकंड सर्किटचे न्यायाधीश स्टीवन जे. मेनाशी आणि न्यू यॉर्कच्या दक्षिण भागासाठी यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टाचे न्यायाधीश डेबोरा ए. बॅट्स यांच्यासाठी लिपिक म्हणून काम केले होते.