
चिलीच्या समुद्र किनाऱ्यावर लिलियाना नावाच्या एका महिलेने रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडीओने सोशल मीडियावर हंगामा झाला आहे. या व्हायरल क्लिपमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर काही रहस्यमयी आकृत्यांचा गट पाण्यात पोहताना आढळला आहे. या व्हिडीओला पाहून सर्वजण अचंबित होत आहेत. काही जणांना या व्हिडीओतील आकृत्या मानवासारख्या वाटत असल्याने खळबळ उडाली आहे.
व्हायरल व्हिडीओतील रहस्यमयी आकृत्या एकत्र पाण्यात डुबक्या घेताना डोके वर खाली करताना दिसत आहे. लांबून त्या कोणा विशालकाय प्राण्यांसारख्या वा सजीवांचा गट दिसत आहेत.काही जण या आकृत्यांना व्हेल माशांचा सामान्य गट मानत आहेत. कारण व्हेल मासे नेहमी समुहाने प्रवास आणि जलक्रिडा करत असतात. आणि पाण्याच्या पृष्ठभागावर येतात. त्यामुळे या आकृत्या बनू शकतात.
येथे व्हिडीओ पाहा –
तर दुसरीकडे अनेक नेटीजन्सच्या मते या आकृत्या मानवासारख्या दिसत आहेत. ते यांना जलपरींचा समुह (Mermaid like Creatures In Ocean) मानत आहेत, किंवा अज्ञात समुद्री जीव मानत आहेत. लोकांचे म्हणणे असे की समुद्रात दिसणारे जीव मानावासारखे आहेत. ते जलपरी सदृश्य दिसत आहेत.
या शिवाय सोशल मीडियावर एक आणखी रंजक थिअरी चालू आहे की अलिकडे रशियात आलेल्या ८.८ तीव्रतेचा शक्तीशाली भूकंपाने समुद्राच्या तळाशी हालचाल झाल्याने हे रहस्यमय जीव पृष्ठभागावर आलेले आहेत. @scaryencounter इंस्टा हँडलने शेअर केलेल्या या व्हिडीओतील क्लिपला आतापर्यंत ६० हजाराहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे.
सध्या या व्हिडीओची सत्यता आणि या आकृत्यांची ओळख एक कोडे बनलेली आहे. जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत किंवा हाय क्वालीटीचा फुटेज समोर येत नाही तोपर्यंत यावर चर्चा सरुच राहणार आहे की ही एक नैसर्गिक घटना आहे की अलौकीक रहस्य ?