इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी शेजारील देशांची मागितली माफी, सरेंडर करण्यावर केले मोठे वक्तव्य

इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शेजारील देशांची माफी मागितली आहे आणि त्यांनी इराणी जनतेच्या सरेंडरची आशा बाळगणाऱ्या शत्रूंनी त्यांची इच्छा त्यांच्यासोबत कबरीत न्यायला हवी असेही वक्तव्य केले आहे.

इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी शेजारील देशांची मागितली माफी, सरेंडर करण्यावर केले मोठे वक्तव्य
Masoud Pezeshkian
| Updated on: Mar 07, 2026 | 4:25 PM

इराणवर इस्राईल-युएसने २८ फेब्रुवारी संयुक्तपणे हल्ला केला आहे. त्यानंतर इराणने शेजारील मुस्लीम देशातील अमेरिकन तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, आता इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शेजारील मुस्लीम देशांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात माफी मागितली आहे. ते म्हणाले आहेत की जोपर्यंत शेजारील देशांकडून इराणवर हल्ला होत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यावर हल्ले करणार नाही. आंतरराष्ट्रीय अहवालानुसार या निर्णयाने इराणच्या अस्थायी नेतृत्व परिषदेने मंजूरी दिली आहे. आणि या क्षेत्रातून अनेक दिवस सुरु असलेल्या भीषण लढाईनंतर तणाव कमी होण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल मानले जात आहे. पेझेश्कियान युद्धाच्या कारणामुळे निर्माण झालेल्या अस्थितरतेसाठी शेजारील देशांशी माफी मागितली आणि म्हटले की हे संकट संपूर्ण क्षेत्रात पसरु नये अशी इराणची इच्छा आहे.

शेजारील देशांवरील हल्ल्यासाठी मागितली माफी

एएफपी अनुसार, पेझेश्कियान म्हणाले की मला माझ्यावतीने आणि इराणच्यावतीने त्या शेजारील देशांची माफी मागितली पाहिजे ज्यांच्यावर इराणने हल्ला केला आहे. हे वक्तव्य त्या युद्धानंतर आले आहे जे गेल्या आठवड्यात अमेरिका आणि इस्राईलद्वारा इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरु झाले आहे. या हल्ल्यात कथितपणे इराणचे सुप्रीम लीड आयातुल्ला अली खामेनेई सह शेकडो अन्य लोक मारले गेले आहेत. त्यानंतर इराणने या क्षेत्रातील अमेरिका आणि इस्राईलशी संबंधित स्थळांना टार्गेट करीत मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले आहेत. या चकमकीत मध्य-पूर्वेत व्यापक युद्धाची शंका खूपप्रमाणात वाढली आहे.

इराण शरण येणार नाही

शेजारील देशांवर हल्ले रोखण्याचे संकेत देत असतानाच इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियनने स्पष्ट केले की इराण इस्राईल वा अमेरिकेच्या दबावासमोर झुकणार नाही. सरकारी टीव्हीवरुन प्रसारित केलेल्या आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की इराणची जनता केव्हाच सरेंडर करणार नाही. त्यांनी इशारा दिला की इराणच्या शरण येण्याची आशा करणाऱ्यांना यश मिळणार नाही. ते म्हणाले की देश स्वत:ची संरक्षण करणे जारी ठेवेल. एएफपीनुसार पेझेश्कियन यांनी सांगितले की,’ शत्रूंना इराणी जनतेच्या शरणागती इच्छा स्वत: सोबत कबरीत न्यायला हवी.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us