AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण युद्धानंतर नेतान्याहू तुरुंगात जाणार?, ट्रम्प यांना सतावतेय भीती

इराणवर २८ फेब्रुवारी इस्राईल-अमेरिकेने हल्ला केल्यानंतर आता युद्ध कोणते वळण घेणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. इराणच्या नेतृत्वाची संपूर्ण फळी युद्धाच्या पहिल्याच टप्प्यात नष्ट करण्यात आली आहे. तरीही इराण अमेरिकचे तळ ज्या देशात आहेत तेथे हल्ले सुरुच ठेवले आहेत.

इराण युद्धानंतर नेतान्याहू तुरुंगात जाणार?, ट्रम्प यांना सतावतेय भीती
netanyahu and trump
| Updated on: Mar 06, 2026 | 8:08 PM
Share

इराणवर अमेरिका-इस्राईल यांनी हल्ला केल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की इस्राईलच्या राष्ट्राध्यक्ष इसाक हर्जोग यांनी नेतान्याहू यांनी लागलीच माफ करायला हवे. म्हणजे ते इराणच्या विरोधात सुरु असलेल्या युद्धावर फोकस करतील. ट्रम्प यांनी अमेरिकन मीडिया एक्सियोसला दिलेल्या फोनवरील मुलाखतीत हे म्हटले आहे. ते म्हणाले की जवळपास प्रत्येक दिवशी नेतान्याहू यांच्याशी मी बोलतो आणि युद्धा संदर्भात चर्चा करत होतो. त्यांची इच्छा आहे की नेतान्याहूच्या डोक्यात केवळ इराणचे युद्ध असावे त्यांच्याविरोधात कोर्टात सुरु असलेल्या खटल्यांचा दबाव नको.

नेतान्याहू यांच्यावर साल २०२० पासून भ्रष्टाचाराचे अनेक खटले सुरु आहेत. त्यांच्यावर त्यांनी अब्जाधीशांकडून महागडी गिफ्ट घेतल्याचा आरोप आहे. या भेटीत सिगार,शँपेन, ज्वेलरी आणि इतर किंमती वस्तूंचा समावेश आहे. त्या बदल्यात त्यांना राजकीय लाभ पोहचवल्याचा नेतान्याहूंवर आरोप आहे. ट्रम्प यांना या आरोपांना राजकीय षडयंत्र म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की पंतप्रधानांवर वाईन आणि सिगार संदर्भात खटले चालवणे योग्य नाही.

पाच वेळा माफी मागितली !

ट्रम्प यांनी हा देखील दावा केला की गेल्या एक वर्षात राष्ट्राध्यक्ष हर्जोग यांनी त्यांना पाच वेळा सांगितले होते की ते नेतान्याहू यांना माफ करतील. परंतू आतापर्यंत असे झालेले नाही. ट्रम्प यांच्या मते हर्जोग या मुद्याचा नेतान्याहूवर दबाव बनवण्यासाठी वापर करत आहेत. ट्रम्प यांना सावधान केले की जर लवकर माफी दिली नाही तर या प्रकरणाला आपण सार्वजनिक रुपात आणत राहू. जोपर्यंत नेतान्याहू यांना माफी दिली जात नाही तोपर्यंत आपण हर्जोग यांना भेटणार नाही असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

मात्र इस्राईलच्या एका सिनियर ऑफीसरने ट्रम्प यांचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की हर्जोग यांनी कधीच माफी देण्याचा वादा केला नाही. त्यांनी केवळ असे म्हटले होते की कायदेशीर प्रक्रियेच्या मते या अपिलावर ते विचार करतील.

राष्ट्राध्यक्षाच्या कार्यालयाने वक्तव्य जारी केले

राष्ट्राध्यक्ष हर्जोगच्या कार्यालयाने देखील निवेदन केले आहे. यात म्हटले आहे की इस्राईल एक सार्वभौम देश आहे. येथे सर्व निकाल कायद्यानुसारच घेतले जातात. तज्ज्ञाच्या मते जर माफी जरी दिली गेली तरी यास विदेशी राजकीय दबावाचे प्रकरण मानून सुप्रीम कोर्टात यास आव्हान देता येऊ शकते.

सध्या युद्धामुळे कोर्टाचे काम मर्यादित केल आहे. आणि नेतान्याहू यांच्यावरील खटला अस्थायी रुपाने थांबला आहे. इस्राईली कायद्यानुसार माफी मिळण्यासाठी आधी गुन्हा कबूल करावा लागतो आणि पश्चाताप झाल्याचे मान्य करावे लागते. मात्र, नेतान्याहू यांनी आतापर्यंत कोणतीही चूक कबूल करण्यास इन्कार करत आले आहेत. त्यांचे वकील देखील सुनावणी टाळण्याचा प्रयत्न करत आले आहेत. यामुळे हे प्रकरण अजूनही पूर्ण संपलेले नाही.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...