नको तसा कंटेन्ट शेअर करुन मॉडेलने कमावले कोट्यवधी रुपये, नंतर गावात बांधली शाळा

एका मॉडेलने तिचे स्वप्न लहानपणी पूर्ण झाले म्हणून गावातील इतर मुलांसाठी शाळा बांधली. तिने त्यासाठी सोशल मीडियावर नको तसा कंटेन्ट तयार केला आणि शेअर केला.

नको तसा कंटेन्ट शेअर करुन मॉडेलने कमावले कोट्यवधी रुपये, नंतर गावात बांधली शाळा
Model Maureen Smiles
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Oct 06, 2026 | 8:02 AM

एखाद्या व्यक्तीवर कधी कोणती परिस्थिती ओढावेल हे सांगता येत नाही. एका मॉडेलने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत. तिने थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमाई करण्यास सुरुवात केली. यातून मिळालेल्या पैशातून तिने असे काही केले की तिच्या कुटुंबियांना देखील आनंद झाला आहे. आता या मॉडेलने नेमकं काय केलं? चला जाणून घेऊया…

एका झोपडीत वाढलेल्या माउर्न स्माइल्सचे शाळेत जाण्याचे स्वप्न होते. पण परिस्थितीमुळे तिच्या कुटुंबियांना शाळेची फी परवडत नव्हती. त्यामुळे तिला वयाच्या 17व्या वर्षी शाळा सोडावी लागली होती. त्यानंतर अनेक वर्षांनंतर, ओन्लीफॅन्सवर तिने काही कंटेन्ट शेअर करण्यास सुरुवात केली. त्यामधून तिला दरमहा जवळपास 64 लाख रुपये मिळू लागले. या पैशातून ती आता बालपणीचे स्वप्न स्थानिक मुलांसाठी शाळा उभी करुन जगत आहे.

Loading...

२०२४ मध्ये स्माइल्सने सेबूमधील नागामध्ये जमीन खरेदी करण्यासाठी १७.५ लाख फिलिपाइन पेसो खर्च केले. तिची मूळ योजना ही जागा स्थानिक नगरपालिकेला दान करण्याची होती. परंतु सरकारी नियमांमुळे तिच्या दिवंगत वडिलांच्या नावावर इमारत देणे शक्य होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर तिने संपूर्ण बांधकाम स्वतःच्या खर्चाने आणि व्यवस्थापनाखाली करण्याचा निर्णय घेतला.

Filipino Model Maeurn Smiles Uses Money Made On OF To Build School In Her Hometown
by
u/Rough_Ad_8702 in
MadeMeSmile

२०२५ मध्ये या जागेवर सामुदायिक शिक्षण केंद्र उघडण्यात आले. येथे परिसरातील मुलांना विज्ञान, स्वयंपाक आणि सर्जनशील कला यांसारख्या व्यावहारिक विषयांचे शिक्षण दिले जाते. प्राथमिक शाळेच्या इमारतीचे काम सुरू आहे. बांधकाम पूर्ण झाल्यावर येथे सुमारे तीनशे विद्यार्थी शिकू शकतील.

अडचणींवर मात आणि ऑनलाइन ब्लॅकमेल

स्माइल्सचा आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास अत्यंत कठीण परिस्थितीत सुरू झाला. ऑनलाइन प्रेक्षक मिळण्यापूर्वी तिने कुटुंबाला मदत करण्यासाठी चीनमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी दिवसभर कष्ट केले. ऑनलाइन कंटेंट तयार करण्याच्या सुरुवातीच्या प्रयत्नात एका अपरिचित व्यक्तीने तिच्या खाजगी व्हिडीओच्या आधारे खंडणीची मागणी केली होती. “त्यावेळी मला पैसे कसे मिळवायचे हे नीट कळत नव्हते, म्हणून मी लोकांना माझा कंटेंट विकत घेण्यासाठी मेसेज करत होते. त्याने पैसे दिले नाहीत आणि त्याचा वापर माझ्याविरुद्ध केला. अधिक व्हिडिओ पाठवले नाहीत तर तो माझ्या कुटुंबाला पाठवेल, अशी धमकी दिली. त्यावेळी माझ्या कुटुंबाला काहीही माहीत नव्हते आणि ते कॅथलिक आहेत. मी खूप घाबरले होते कारण मी खूप तरुण होते” असे ती म्हणाली. पण तिने यातूनही मार्ग काढला आणि कुटुंबियांना सत्य सांगितले. तिच्या कुटुंबियांनी तिला पाठींबा दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us