
जगातील महासत्ता देशांमध्ये अमेरिका अग्रस्थानी मानला जातो. शक्ती, पैसा, आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध सुविधा यामुळे अमेरिका जगभरात प्रभावशाली आहे. त्याचप्रमाणे युनायटेड किंग्डम, चीन, रशिया, भारत, फ्रान्स आणि United Arab Emirates हे देशही आर्थिकदृष्ट्या सक्षम मानले जातात.

मात्र, जगातील सर्वात श्रीमंत लोक मोठ्या देशांत नाही तर युरोपातील छोट्याशा मोनाको या देशात राहतात. क्षेत्रफळाने लहान असला तरी हा देश जगातील सर्वात श्रीमंत लोकांचे निवासस्थान म्हणून ओळखला जातो.

मोनाको हा युरोपातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. या देशात एकाच वेळी समुद्रकिनारा आणि डोंगराळ भाग दोन्ही पाहायला मिळतात. सुरक्षितता, स्वच्छता आणि पर्यावरणाच्या बाबतीत हा देश जगातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक मानला जातो.

मोनाकोमध्ये जमीन अत्यंत महाग आहे. येथे एका स्क्वेअर मीटर जमिनीची किंमत सुमारे 88 लाख रुपये आहे. म्हणजेच फक्त 1 मीटर लांब आणि 1 मीटर रुंद जागेसाठी जवळपास 88 लाख रुपये मोजावे लागतात.

जर घर घ्यायचे असेल तर 100 स्क्वेअर मीटरचे घर साधारण 30 ते 35 कोटी रुपयांपर्यंत मिळते. त्यामुळे हा भाग जगातील सर्वात महागड्या निवासी भागांपैकी एक मानला जातो. येथे इमारती अत्यंत उंच आणि दाट बांधलेल्या आहेत. कारण मोनाकोचे क्षेत्रफळ खूपच लहान आहे.

लहानसा असला तरी मोनाको हा देश जगातील सर्वात लक्झरी आणि महागड्या ठिकाणांपैकी एक आहे. Monte Carlo आणि Larvotto हे भाग जगातील एलिट आणि अब्जाधीश लोकांच्या जीवनशैलीचे प्रतीक मानले जातात.