
शांत आणि व्यापारी मनोवृत्तीच्या ज्यू लोकांनी जगातली सर्वाधिक हिंसक गुप्तचर संघटना उभी केली आहे. मोसाद या इस्राईल हेर संघटनेने अनेक धोकादायक गुप्त मोहिमा पार पाडल्या आहेत.त्यात एक महमूद अल मबुह याची हत्याही आहे. मोसादने हमासचा कमांडर मबूह याला निदर्यीपणे ठार केले. परंतू त्याची हत्या करणे या गुप्तचर एजन्सीसाठी डोकेदुखी ठरले. मिशन तर सक्सेस झाले पण जगभरात इस्राईलची नाचक्कीही झाली.
हमासचा कमांडर महमूद अल-मबूह याच्या नावावर अनेक हत्यांचा आरोप होता. त्याने २ इस्राईल सैनिकांचे अपहरण करुन त्यांना निर्घृणपणे ठार केले होते. त्याला ठार करण्यासाठी मोसादला २० वर्षे वाट पाहावी लागली. मबूह हमाससाठी शस्रास्र पुरवण्याचे काम करायचा. मबूह इराणच्या शस्रास्रांना गाझापट्टीपर्यंत पोहचवायचा.
हमासचा कमांडर मबूह सीरिया, चीन, इराण आणि सूदान सारख्या देशात बहुतांशी वेळ राहायचा. या तीन-चार देशात मोसादच्या एजंटना जाणे कठीण होते. अशात एक देश मिळाला जेथे मिशन रिस्की तर होतेच. मात्र अन्य देशांच्या तुलनेत मोसादला कमी धोका होता.
मिशन तयार होते आणि इस्राईल गुप्तचर टुरिस्ट बनून हमासचा कमांडर मबूह याच्या हत्येसाठी दुबईला पोहचले. या लोकांनी असे फेक पासपोर्ट वापरले जे काही काळापूर्वी असली लोकांनी वापरले होते. त्यावेळी दुबईची सुरक्षा इतकी मजबूत नव्हती. मोसादला वाटले आपण पकडले जाणार नाही. त्यांनी येथे महमूद अल-मबूह यांच्या खूप काळ पाळत ठेवली होती. त्याच्या सवयी,येण्या जाण्याचे मार्ग आणि उतरण्याची जागा, सर्वकाही नोट करुन ठेवले होते. त्याला विष देऊन मारायचे असे ठरले. परंतू या विषाचा त्याच्यावर काही परिणाम झाला नाही आणि डाव उधळला.
त्यानंतर २०१० च्या जानेवारीत मोसाद लोक तिसऱ्यांदा दुबई आले. परंतू कमांडर मबूह कोणत्या हॉटेलात उतरला आहे हे एजंटना कळले नाही. त्यामुळे हीट स्क्वॉडने विविध हॉटेलात चेक-इन करण्याचा निर्णय घेतला. येथे काही लोकांनी चुकीने इस्राईल कंपनीने जारी केलेले डेबिट कार्ड वापरले आणि घोटाळा झाला !
अखेर मबूह ज्या हॉटेलात उतरला होता ते एकदाचे सापडले. त्यानंतर हिट स्क्वॉडने त्याच्या रुममध्ये घुसून त्याला मारले. जेव्हा हॉटेल कर्मचाऱ्यांना त्याचा मृतदेह मिळाला तेव्हा त्यांना वाटले एका पर्यटकाचा हार्ट अटॅक मृत्यू झाला असावा. त्यानंतर हा मृतदेह हमासच्या हायप्रोफाईल कमांडर महमूद अल-मबूह याचा आहे हे कळले तेव्हा गोंधळ उडाला.
त्यामुळे दुबई सरकार हमास आणि इस्राईल दोघांवर भडकली, हमास दुबईला बेकायदेशीर कामासाठी वापरत होता. तर इस्राईलने त्यांना काही न कळवता हायप्रोफाईल मिशन आणि हत्या घडवली. त्यानंतर मोसादच्या एजंटे बनावट पासपोर्ट उघड झाले. त्यामुळे दुबई सरकार प्रचंड संतापले. त्यानंतर फ्रान्स, ऑस्ट्रेलिया सारख्या अनेक देशांनी इस्राईलवर टीका केली. मोसादच्या या मिशनमुळे ज्यू देशाला डिप्लोमेटीक विरोधाचा सामना करावा लागला.