आईने मुलाच्या व्यवसायात लावले २.४५ लाख डॉलर, मुलाने उभे केले २ ट्रीलियन डॉलरचे साम्राज्य, कोण आहेत जॅकी बेजोस?

Amazon चे फाऊंडर जेफ बेजोस याच्या कंपनीचे बाजारमुल्य 2 ट्रीलियन डॉलर आहे. भारताची अर्थव्यवस्था लवकरच 3 ट्रीलियन डॉलर होणार आहे. यावरुन जेफ बेजोस यांची कंपनीचे बाजारमुल्य किती हे समजते.

आईने मुलाच्या व्यवसायात लावले २.४५ लाख डॉलर, मुलाने उभे केले २ ट्रीलियन डॉलरचे साम्राज्य, कोण आहेत जॅकी बेजोस?
Jackie Bezos
| Updated on: Aug 15, 2025 | 5:53 PM

जगविख्यात ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनचे (Amazon)  फाऊंडर जेफ बेजोस ( Jeff Bezos ) यांची आई जॅकलिन जॅकी बेजोस यांचे वयाच्यया ७८ व्या वर्षी निधन झाले होते. गेल्या ५ वर्षांपासून जॅकी बॉडी डिमेंशिया नावाच्या मेंदूच्या आजाराशी लढत होत्या. त्यांचे निधन मियामी येथील घरात झाले. जॅकी यांचा जन्म १९४६ मध्ये वॉशिंग्टन डीसीत झाला. त्यानंतर त्या कुटुंबासह अल्बुकर्क, न्यू मेक्सिको येथे गेल्या. १७ वर्षांच्या असताना त्यांनी जेफे बेजोस याला जन्म दिला. त्यावेळी त्यांनी शिक्षण घेत असताना बँकेत काम केले आणि सायंकाळी कॉलेजच्या क्लास अटेंड केल्या.

Amazon मध्ये पहिली गुंतवणूक

साल १९९५ मध्ये जॅकी आणि त्यांचे पती मिगुएल ( माईक ) बेजोस यांनी ॲमेझॉनमध्ये सुरुवातीची गुंतवणूक केली. त्यानंतर दोन चेक द्वारे एकूण २,४५,५७३ डॉलर लावले. जेव्हा जेफ यांनी स्वत: सांगितले की ही कंपनी यशस्वी होऊ शकते किंवा होणारही नाही. परंतू ही गुंतवणूक नंतर अब्ज डॉलरमध्ये बदलली. अमेझॉन आज जगातील सर्वात मोठी कंपन्यांपैकी एक आहे. आणि याचे बाजार भांडवल २ ट्रीलियन डॉलरहून अधिक आहे. साल २०१८ मध्ये त्यांची संपत्ती सुमारे ३० अब्ज डॉलर झाली होती.

कौटुंबिक जीवन

जॅकी बेजोस याने तीन मुले होती. जेफ, क्रिस्टीना आणि मार्क यांना त्यांनी वाढवले. ती मुलांचा अभ्यास, खेळ आणि हॉबी नेहमीच सहभाग घेतला. जॅकी यांनी आपल्या मुलांचे संगोपनात कोणतीही कसर सोडली नाही. ती जेफसाठी रेडीओ शॅक जात असायची,क्रिस्टीनाचे चिअरलीडींग प्रॅक्टीसमध्ये मदत करायची आणि मार्कसाठी ड्रम धुवायची.

शिक्षण आणि समाजसेवा

४५ व्या वयात जॅकी बेजोस यांनी मनोविज्ञानात डीग्री घेतली. आणि साल २००० मध्ये कुटुंबासह बेजोस फाऊंडेशनची (Bezos Family Foundation) स्थापना केली. ही संस्था फाऊंडेशन शिक्षण आणि मुलांच्या विकासासाठी काम करते.

आईच्या निधनावेळी भावूक झाले जेफ बेजोस

जेफ बेजोस यांनी आपली आईला श्रद्धांजली वाहताना लिहीले की त्यांनी मला आणि आमच्या कुटुंबावर विनाअट प्रेम दिले. त्या आमच्या सोबत होत्या हे आमचे भाग्य होते असेही त्यांनी लिहीले.