AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळमध्ये पुरामुळे भयंकर विध्वंस; भीषण संकटादरम्यान अमेरिका मदतीला, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

नेपाळमध्ये पुरामुळे भयंकर विध्वंस झाला आहे. या भीषण संकटादरम्यान अमेरिका नेपाळच्या मदतीला धावली आहे. या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे.

नेपाळमध्ये पुरामुळे भयंकर विध्वंस; भीषण संकटादरम्यान अमेरिका मदतीला, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
nepal flood Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 7:26 AM
Share

नेपाळ-तिबेट सीमेवर पुरामुळे भयंकर विध्वंस झाला आहे. या भीषण पूर परिस्थितीमुळे नेपाळमधील काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुरामुळे आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1500 हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत. पुरामुळे अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. बचाव पथकाकडून सातत्याने मदतकार्य सुरू आहे. बेपत्ता लोकांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या भीषण संकटादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेपाळसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेपाळच्या मदतीला पुढे सरसावले आहेत. नेपाळमधील पूर अतिशय भयंकर असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. वॉशिंग्टनहून नेपाळमधील नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, ‘नेपाळमधील पूर अतिशय भयंकर असून आम्ही नेपाळमधील नेत्यांना फोन केला होता. आम्ही त्यांना मदतीविषयी विचारणा केली. नेपाळसोबत आमचे संबंध चांगले आहेत. पुरामुळे सर्वत्र नेपाळमध्ये चिखल आणि पाणी झालं आहे. खरंतर या दोन्ही मिश्रणाचा पूर आलाय, असे दृश्य दिसत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. असे दृश्य याआधी कधीही पाहिले नव्हते’.

‘नेपाळमध्ये बाहेरून मजबूत दिसणाऱ्या इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. ही सर्वात भयंकर घटना आहे. आमचं नेपाळमधील नेत्यांशी बोलणे सुरू आहे. नेपाळ जी मदत मागेल, ती मदत करू, असेही ट्रम्प यांनी आश्वासित केले. नेपाळमधील पुरानंतर भारत देश देखील मदतीला धावला आहे. भारतानेही नेपाळसाठी मदतकार्याचा वेग वाढवला आहे. भारताने गुरुवारी सकाळी दिल्लीच्या हिंडन विमानतळावरून सी-17 लष्करी वाहतूक विमानाद्वारे नेपाळला 35-37 टन मदतीचं साहित्य पाठवलं. भारताने मानवतावादी दृष्टीकोनातून नेपाळला ही मदत पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळने या मदतीबद्दल भारताचे आभार देखील मानले आहेत.

तत्पूर्वी, भारत, अमेरिकेव्यतिरिक्त ब्रिटेन, वर्ल्ड बँकेनेही आधीच मदतीची घोषणा केली आहे. आशियन डेव्हलेपमेंट बँकचे अध्यक्ष मासातो कांडा यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्या चर्चा करून पुराची पूर्वसूचना प्रणाली आणखी मजबूत करण्यासाठी मदतीचे आश्वासन दिलं. त्याचबरोबर नेपाळी दूतावासांना कोणतीही आर्थिक मदत ही फक्त पंतप्रधानांच्या मदत निधीमार्फतच स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Follow Us
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....