Nepal Landslide : नेपाळमध्ये प्रलयकारी भूस्खलन, अंगाचा थरकाप उडवणार व्हिडीओ समोर; नदीने थेट प्रवाह बदलला?

भूस्खलनाचा फटका महत्त्वाच्या बेनी-जोमसोम मार्गालाही बसला आहे. मलबा रस्त्यावर आल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Nepal Landslide : नेपाळमध्ये प्रलयकारी भूस्खलन, अंगाचा थरकाप उडवणार व्हिडीओ समोर; नदीने थेट प्रवाह बदलला?
nepal landslide
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 28, 2026 | 10:17 PM

Nepal Landslide : नेपाळ हा असा देश आहे जिथे भूकंप, नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडत असतात. जास्त पावसामुळे भूस्खलन झाल्याचाही अनेक घटना समोर आलेल्या आहेत. दरम्यान, सध्या अशीच एक भूस्खलनाची भयावह घटना समोर आली आहे. या घटनेत डोंगराचा मोठा भाग खाली कोसळला आहे. त्यामुळे नदीचा मार्गच बदलला आहे. हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार नेपाळ देशातील मुस्तांग जिल्ह्यातील लेते परिसरात रविवारी सायंकाळी मोठे भूस्खलन झाले. डोंगराचा प्रचंड भाग अचानक कोसळल्याने मोठ्या प्रमाणात माती आणि दगड नदीपात्रात जमा झाले. त्यामुळे प्रसिद्ध कालीगंडकी नदीचा मुख्य प्रवाह काही काळासाठी बाधित झाला. नदीने जुन्या प्रवाहाच्या दिशेने वाट काढत मार्ग बदलला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Loading...

भूस्खलनाची घटना रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. ही घटना घडली तेव्हा त्या भआगातून एक प्रवासी जात होता. त्यानेच ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नदीने आपला प्रवाहच बदलल्याचे दिसतेय. त्यामुळे कालीगंडकी नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

बेनी-जोमसोम मार्गावरील वाहतूक प्रभावित

भूस्खलनाचा फटका महत्त्वाच्या बेनी-जोमसोम मार्गालाही बसला आहे. मलबा रस्त्यावर आल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुस्तांगसह नेपाळच्या अनेक डोंगराळ भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पूर, भूस्खलन आणि नदीकाठची धूप यांचा धोका वाढला आहे.

कालीगंडकी नदीच्या प्रवाहात बदल झाल्याने किनारी भागातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भूस्खलनग्रस्त आणि नदीकाठच्या भागात अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नेपाळमध्ये यापूर्वीही मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या असून अनेक ठिकाणी रस्ते, पूल आणि घरांचे नुकसान झाले आहे. मुस्तांगमधील ताज्या घटनेमुळे डोंगराळ भागातील नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us