नेपाळचा नांगा दबला, थेट पंतप्रधान बालेन शाह भारत दाैऱ्यावर, चीनला धक्का थेट..
भारत आणि नेपाळमधील संबंध गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मागील काही दिवसांपासून तणावात बघायला मिळाली. त्यातच आता बालेन शाह थेट भारत दाैऱ्यावर पोहोचले. चीनसोबत नेपाळची जवळीकता अधिक वाढल्याने भारताची डोकेदुखी वाढली.

नेपाळ मागील काही दिवसांपासून भारताविरोधात भूमिका घेताना दिसला. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी अनेकदा भारताविरोधात विधानेही केली. हेच नाही तर नेपाळमध्ये आलेल्या पुरादरम्यान भारत हा पहिला असा देश होता, जो नेपाळसाठी मदतीला धावून आला. भारताने नेपाळ संकटात असताना प्रत्येक मदत केली. मात्र, त्यावेळीही नेपाळकडून थेट इतर मदत नको तर पैसा द्या म्हटले होते. यासोबतच भारतासोबतच बांगलादेशावर गंभीर आरोप केला.सीमेबद्दलही विधान अनेकदा बालेन शाह यांनी केले. अखेर भारताशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नसल्याचे नेपाळच्या लक्षात आले. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह रविवारी भारत दाैऱ्यावर पोहोचले आहेत. आज त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट होणार आहे.या दाैऱ्यामुळे भारत आणि नेपाळ यांच्यातील नव्या अध्यायाला सुरूवात होईल.
बालेन शाह यांना नेपाळमध्ये मजबूत सरकार हवी आहे. राजेशाही संपून पहिल्यांदा नेपाळमध्ये स्पष्ट बहुमताचे सरकार बनले. मार्चमध्ये नेपाळची सूत्रे हातात घेतल्यापासून बालेन शाह पहिल्यांदा भारत दाैऱ्यावर आले आहेत. बालेन शाहंकडून वारंवार भारत दाैरा टाळला जात होता. अखेर नांगा दबल्याने त्यांना भारताची वाट दिसली आहे. मुळात म्हणजे भारत आणि नेपाळ यांच्यातील जुने संबंध आहेत.
नेपाळच्या अर्थव्यवस्था भारतावर अवलंबून आहे. नेपाळच्या विकासात भारताचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून नेपाळमध्ये चीनचा हस्तक्षेप अधिक वाढला आहे. ज्यामुळे भारत चिंतेत होता. भारत आणि नेपाळमध्ये 1800 किलोमीटर उघडी सीमा आहे.दोन्ही देशातील नागरिक आराम प्रवेश करू शकतात. मंत्रालयाने स्पष्ट केले की, बालेन शाह यांच्या भारत दाैऱ्यात सीमेचा कोणताही मुद्दा नाही.
बालेन शाह हे दोन दिवशीय भारत दाैऱ्यावर आहेत. मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत त्यांची बैठक झाली. राज्य मंत्री जितिन प्रसाद यांच्याकडून भारतात बालेन शाह यांचे स्वागत करण्यात आले. आता दोन्ही देशातील संबंध सुधारण्याची शक्यता आहे. भारतासाठी नेपाळ हा महत्वपूर्ण शेजारी देश आहे. मात्र, नेपाळ चीनच्या अधिक जवळ जाताना दिसतोय.