पदभार सांभाळताच या सीईओने घेतला मोठा निर्णय, जगभरातील 16000 नोकऱ्यांवर कुऱ्हाड, काय आहे अखेर मजबूरी ?

Nestlé कंपनीच्या नव्या नेतृत्वावर दबाव वाढलेला आहे, कंपनीला स्थिर करणे आणि गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा निर्माण करणे अशी दुहेरी जबाबदारी नवे सीईओ फिलीप यांच्यावर पडली आहे.

पदभार सांभाळताच या सीईओने घेतला मोठा निर्णय, जगभरातील 16000 नोकऱ्यांवर कुऱ्हाड, काय आहे अखेर मजबूरी ?
Philipp Navratil
| Updated on: Oct 16, 2025 | 11:05 PM

जगातील सर्वात मोठ्या कंपनी पैकी एक असलेल्या नेस्टले ( Nestlé ) कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. ही कंपनी स्विस मल्टी नॅशनल कंपनी असून गेल्याच महिन्यात तिचे सीईओ म्हणून फिलिप नवराटिल (Philipp Navratil) यांनी पदभार सांभाळला आहे. या कंपनीच्या सीईओने पदभार सांभाळताच जगभराती १६ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सोळा हजार पदे समाप्त करण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.

नेस्टले या बहुराष्ट्रीय कंपनीचे सीईओ म्हणून फिलिप नवराटिल हे सप्टेंबर २०२५ रोजी नियुक्त झाले होते. त्यांनी आल्या आल्याच कंपनीच्या १६ हजार पदांना समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. फिलिफ यांनी सांगितले की वेळ बदलत आहे आणि नेस्टलेला देखील बदल करावा लागणार आहे.

कोणा-कोणाची नोकरी जाणार

नेस्टले कंपनीने सांगितले की या १६ हजार पदांपैकी सुमारे १२ हजार पदे व्हॉईट कॉलर कर्मचाऱ्यांची असणार आहेत.या कपातीने कंपनीला सुमारे १ अब्ज स्विस फ्रँक बचत होणार आहे. आधीच नेस्टले कंपनीने प्रोडक्शन आणि सप्लाय चेन सेक्टर्समधील ४ हजार पदांची कपात चालू केली आहे. जिला आता या योजनेत समाविष्ठ केले आहे.

नेस्टले कंपनीने म्हटले आहे की साल २०२७ च्या अखेरपर्यंत कंपनी खर्चात ३ अब्ज स्विस फ्रँक बचत करु इच्छित आहे. जे आधी ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा ( २.५ अब्ज ) अधिकचे आहे. ही घोषणा अशा वेळी झालेली आहे, जेव्हा नेस्टलेने आपला ९ महिन्यांचा आर्थिक अहवाल जारी केलेला आहे. या अहवालात सांगतलेले आहे की कंपनीच्या विक्रीत १.९ टक्क्यांची घसरण झालेली आहे. आणि तिला ६५.९ अब्ज स्विस फ्रँकची कमाई झालेली आहे.

कंपनीत मोठे बदल होत आहेत

तज्ज्ञांच्या मते हे निर्णय कंपनीने केवळ आर्थिक दबावातून घेतलेले दिसत आहेत. कंपनी आपल्या आराखड्यातही आमुलाग्र बदल करत आहे. नवराटिल अशा वेळी कंपनीचे सूत्रे घेतली आहेत. जेव्हा कंपनीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. उदाहरणासाठी जुन्या सीईओंना हटवण्याचा मुद्दा देखील गाजला होता. याशिवाय कंपनीने जल संबंधी वादाने (bottled water scandal) देखील प्रभावित झाली होती. हा वाद फ्रान्स सोबत सुरु होता.

जगभरात नेस्टलेचे ब्रँड

Nestlé कंपनीचे जगभरात २ हजाराहून अधिक ब्रँड आहेत. कंपनी आता खर्च कमी करण्यासह त्या त्या क्षेत्रांवर लक्ष देत आहे. जेथे नफा अधिक आहे आणि भविष्यात विकास करण्याची संधी आहे. जर भारताचा विचार केला तर नेस्ले इंडिया लिमिटेड नेस्टलेची भारतीय सहायक कंपनी आहे. नेस्टले इंडियाने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात सुमारे २३.६ टक्के घट झाली आहे तरही कंपनीच्या शेअरची किंमत रेकॉर्ड स्तरावर पोहचली आहे. शेअरमधील तेजीला मुख्य कारण हे आहे की कंपनीने ऑपरेशन आणि विक्री वाढविली आहे. आणि घरगुती विक्रीत १०.८ टक्के वाढ झाली आहे. रेव्हेन्यू फ्रॉर्म ऑपरेशन्स सुमारे ५,६४३.६ कोटी राहिले आहे. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत १०.६ टक्के जास्त आहे.