नेतन्याहू यांची हत्या की जिवंत? नव्या व्हिडीओने जगात खळबळ; मोठं काहीतरी घडणार?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांनी जगभर खळबळ उडवली होती. आधीचा AI व्हिडिओनंतर, आता एका नव्या व्हिडिओमध्ये नेतन्याहू जिवंत आणि कॉफी पिताना दिसले आहेत. यामुळे त्यांच्या मृत्यूच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, इतके दिवस ते कुठे होते आणि आता अचानक का प्रकटले, यामुळे मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत. या व्हिडिओमागे इस्रायलचा काय संदेश आहे, यावर चर्चा सुरु आहे.

नेतन्याहू यांची हत्या की जिवंत? नव्या व्हिडीओने जगात खळबळ; मोठं काहीतरी घडणार?
Israel PM
Image Credit source: Google
| Updated on: Mar 15, 2026 | 9:21 PM

इराण-इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध जोरात सुरू असून या युद्धाने संपूर्ण जगच होरपळून निघालं आहे. हे युद्ध सुरू असतानाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे ठार झाल्याचं वृत्त येऊन धडकलं. नेतन्याहू यांची हत्या केल्याचंही सांगितलं गेलं. नेतन्याहू गेल्या काही दिवसांपासून मीडियासमोर आले नाहीत. त्यांची कोणतीही बातमी आली नाही. त्यातच एक व्हिडिओ आला आणि जगात खळबळ उडाली. नंतर हा व्हिडीओ AI निर्मित असल्याचं सांगितलं गेलं. पण नेतन्याहूचा काहीच पत्ता नसल्याने अफवांचा बाजार सुरूच होता. या अफवा सुरू असतानाच आता आणखी एक नवीन व्हिडीओ आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या व्हिडीओतून नेमके काय संकेत देण्यात आले? यामुळे जगात काही मोठं घडणार आहे का? अशी चर्चा आता रंगली आहे.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूची अफवा पसरल्यानंतर सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ आला आहे. या व्हिडीओत नेतन्याहू एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी पिताना दिसत आहेत. या व्हिडीओला एक कॅप्शनही देण्यात आलं आहे. त्यावर मी काय आहे? असं या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. त्यामुळे नेतन्याहू यांची हत्या झाल्याची अफवा होती हे स्पष्ट झाले असून नेतन्याहू हे जिवंत असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं आहे. हा व्हिडीओ शेअर करून इस्रायलला नेमका काय संदेश द्यायचा आहे? नेतन्याहू हे वेगळं काही मोठं घडवणार आहेत का? इतक्या दिवसानंतर ते का प्रकटले? इतके दिवस नेतन्याहू कुठे होते? काय करत होते? या काळात काही मोठा प्लान शिजला का? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत.

नव्या व्हिडिओत काय?

नव्या व्हिडीओत नेतन्याहू चहा पिताना दिसत आहेत. ते एका रेस्टॉरंटमध्ये आहेत. तसेच आपल्या हाताला पाचच बोटे असल्याचंही नेतन्याहू सांगताना दिसत आहेत. त्यामुळे नेतन्याहू हे जिवंत असून त्यांच्या मृत्यूच्या केवळ अफवा असल्याचं सिद्ध झालं आहे. हा व्हिडिओ खराखुरा असून फेक नसल्याचंही सांगितलं जात आहे.

एक फेक व्हिडीओ आणि…

या आधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात नेतन्याहू यांची हत्या झाल्याचं सांगितलं जात होतं. 13 मार्च रोजी नेतन्याहू यांचा एक व्हिडीओ आला होता. पण या व्हिडीओत त्यांच्या हाताला सहा बोटे दिसली होती. त्यामुळे हा व्हिडीओ एआय निर्मित वा डीपफेक असल्याचा दावा यूजर्सने केला होता. नेतन्याहू यांना सहा बोटे नाहीत. या व्हिडीओत सहा बोटे आहेत. याचाच अर्थ नेतन्याहू यांचा हा फेक व्हिडीओ असून ते मारले गेले आहेत, असा दावा सोशल मीडियातून केला गेला होता. त्यातच अमेरिकेतील काही एक्स हँडलरनीही नेतन्याहू यांच्या मृत्यूबाबत काही प्रतिक्रिया व्यक्त केल्याने नेतन्याहू मारल्या गेल्याच्या चर्चांना अधिकच बळ आलं होतं.

नेतन्याहू यांची हत्या झाली किंवा एक तर ते जर्मनीला पळून गेलेत असा दावा केला गेला होता. मात्र, नेतन्याहू यांच्या कार्यालयातून प्रतिक्रिया आली. नेतन्याहू पूर्ण सुरक्षित आहेत. ते कुठेही गेलेले नाहीत, असं नेतन्याहू यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं होतं.

मोजतबा सुरक्षित

दरम्यान, इराणचे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनी हे मारल्या गेल्याची चर्चा होती. तसेच ते गंभीर जखमी असल्याचंही सांगितलं जात होतं. या सर्व चर्चांवर इराण सरकारने प्रतिक्रिया दिली आहे. मोजतबा अत्यंत सुरक्षित आहेत. त्यांना कोणत्याही जखमा झालेल्या नाहीत, असं इराणने म्हटलं आहे. दरम्यान, 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात मोजतबा अत्यंत गंभीर जखमी झाल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच ते कोमात असून त्यांचा एक पाय कापला गेल्याचंही सांगितलं गेलं होतं. ब्रिटिश मीडिया द सनच्या रिपोर्टमध्ये हा दावा केला गेला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोजतबा गंभीर जखमी झाल्याचा दावा केला होता. इराणने हा दावा फेटाळून लावला आहे.

Follow Us