Osama bin Laden : लादेनला मारून अमेरिकेनं असा घेतला 9/11 हल्ल्याचा बदला; पाकिस्तानला अबोटाबाद मिशनची माहिती का दिली नव्हती?

2011 मध्ये पाकिस्तानातील एका गुप्त कारवाईत अमेरिकन सैन्याने ओसामा बिन लादेनला ठार मारलं होतं. पाकिस्तानला लादेनबद्दल किती माहिती होती? अमेरिकेच्या या निर्णयामागील काय कारण होतं, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात..

Osama bin Laden : लादेनला मारून अमेरिकेनं असा घेतला 9/11 हल्ल्याचा बदला; पाकिस्तानला अबोटाबाद मिशनची माहिती का दिली नव्हती?
Osama bin Laden and his house
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 23, 2025 | 1:24 PM

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकतीच ‘अमेरिकन मॅनहंट: ओसामा बिन लादेन’ ही डॉक्युमेंट्री सीरिज प्रदर्शित झाली आहे. 9/11 हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या जगातील ‘मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्याला अमेरिकन सरकारने कसं पकडलं, याबद्दलची माहिती या सीरिजमध्ये देण्यात आली आहे. या सीरिजचे 59, 43 आणि 1 तास 21 मिनिटांचे तीन एपिसोड्स आहेत. 2001 मध्ये झालेल्या हल्ल्यापासून ते 2011 मध्ये पाकिस्तानातील अबोटाबाद इथं अमेरिकन सैन्याने कशा पद्धतीने लादेनला ठार केलं, याची दशकभराची कथा यात पहायला मिळते. यामध्ये सीआयएचे अधिकारी, अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बराक ओबामा यांच्या प्रशासनातील प्रमुख व्यक्तींचाही समावेश आहे. 2 मे 2011 च्या रात्री ओसामा बिन लादेनच्या निवासस्थानावर छापा टाकण्यापूर्वी ओबामा यांनी त्याबद्दल पाकिस्तान सरकारला का सावध केलं नाही, यावरही सीरिजमध्ये थोडक्यात प्रकाश टाकला आहे. ओसामा बिन लादेनला कसं शोधलं? 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेच्या भूमीवर सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा