AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर्मनीत न्यूज-9 ग्लोबल समिटचं आयोजन, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज होणार सहभागी

News 9 global Summit : Tv9 ग्रुपच्या न्यूज 9 ग्लोबल समिट या कार्यक्रमाचं आयोजन यंदा जर्मनीत करण्यात येणार आहे. या समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

जर्मनीत न्यूज-9 ग्लोबल समिटचं आयोजन, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज होणार सहभागी
Barun Das and Pm Narendra Modi
| Updated on: Nov 11, 2024 | 5:00 PM
Share

Tv9 ग्रुपच्या न्यूज-9 ग्लोबल समिटचं आयोजन हे 21 ते 23 नोव्हेंबरदरम्यान जर्मनी येथे करण्यात आलं आहे. या समिटमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा होणार आहे. या समिटमध्ये देशविदेशातील अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत, अशी माहिती Tv9 ग्रुपचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी दिली. या समिटमध्ये भारत आणि जर्मनी यांच्यातील विकासावर चर्चा होणार आहे. या समिटमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक दिग्गज उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान मोदी 22 नोव्हेंबरला या समिटमध्ये सहभागी होणार आहेत. जगात कोणकोणत्या क्षेत्रात विकासाची आशा आहे, या विषयावर नरेंद्र मोदी बोलणार आहेत. या समिटचं आयोजन जर्मनीतील स्टटगार्ट येथील एमएचपी एरिना स्टेडियमध्ये करण्यात आलं आहे.

या ग्लोबल समिटला 21 नोव्हेंबरला भारत आणि जर्मनीच्या राष्ट्रगीताने सुरुवात होईल. पहिल्या सत्रात भारत आणि जर्मनीतील विकासाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. तसेच विकासाबाबत अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये अनेक सत्रात दिग्गज मंडळी आपले विचार मांडतील. तर 22 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील.

एआय आणि डिजीटल इकॉनॉमीवर चर्चा

एआयमुळे अनेक गोष्टी सुसह्य झाल्या आहेत. एआयची सर्वच क्षेत्राच चर्चा पाहायला मिळत आहे. एआयमुळे मोठी क्रांती झाली आहे. या समिटच्या दुसऱ्या दिवशी 22 नोव्हेंबरला एआय अर्थात आर्टीफीशीयस इंटेलिजन्स आणि डिजीटल इकॉनॉमीवर चर्चा होणार आहे. तसेच समिटमध्ये अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे या समिटकडे देशाचं लक्ष असणार आहे.

भारत-जर्मनी या 2 देशांमधील व्यापारी संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने TV9 नेटवर्ककडून न्यूज-9 ग्लोबल समिटचं आयोजन करण्यात आलं आहे. या समिटमध्ये दोन्ही देशातील उद्योजक, राजकीय नेते आणि केंद्रीय मंत्री सहभागी होणार आहेत.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.